ट्विटरच्या मालकाकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी संपत्तीच्या एकूण २८ टक्के रक्कम दान

ट्विटरचे मालक जॅक डोर्सी यांनी कोरोना साथीचा सामना करण्यासाठी मोठी मदत केली आहे

Updated: Apr 8, 2020, 09:06 AM IST
 ट्विटरच्या मालकाकडून कोरोनाचा सामना करण्यासाठी संपत्तीच्या एकूण २८ टक्के रक्कम दान title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतात उद्योगपती रतन टाटा यांनी मोठी मदत केली आहे. त्या प्रमाणे पेमेंट अॅप आणि ट्विटरचे मालक जॅक डोर्सी यांनी कोरोना साथीचा सामना करण्यासाठी मोठी मदत केली आहे. जॅक डोर्सी यांनी एक अब्ज डॉलर कोविड-१९ मदत कोषमध्ये दान करण्याची घोषणा केली आहे. ट्विटरचे मालक जॅक डोर्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा त्यांच्या संपत्तीच्या २८ टक्के आहे.

भारतात २४ तासात ५०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमणामुळे १२४ मृत्यू झाले आहेत. तर एकूण ४ हजार ७८९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

जगभरात आतापर्यंत कोरोनाचे ८१ हजार २५० बळी गेले आहेत, जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १४ लाखांच्यावर गेला आहे. तर सकारात्मक बाब म्हणजे जगभरात २ लाख ९८ हजार ५०० रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.