उडत्या विमानात हाणामारी, एका प्रवाशाकडून दुसऱ्यावर लघवी... वैतागलेल्या पायलटनं उचललं असं पाऊल

फ्लाइटच्या आत दोघांनी एकमेकांना लाथ मारली, ज्यानंतर त्याचं हे भांडणं फारच वाढलं, पुढे त्यांनी खूपच विचित्र प्रकार देखील केला.

Updated: Jun 5, 2022, 08:42 PM IST
उडत्या विमानात हाणामारी, एका प्रवाशाकडून दुसऱ्यावर लघवी... वैतागलेल्या पायलटनं उचललं असं पाऊल title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीनुसार, दोन भावांनी उडत्या उड्डाणात गोंधळ घातला. दोन्ही भाऊ पूर्णपणे नशेत होते. फ्लाइटच्या आत दोघांनी एकमेकांना लाथ मारली. ज्यानंतर त्याचं हे भांडणं फारच वाढलं आणि ते इथपर्यंत पोहचलं की, त्यांनी त्यांपैकी एका भावाने चक्कं दुसऱ्या भावावरती विमानातच लघवी केली. या बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. जी गोष्ट ऐकायला किळसवाणी वाटत आहे ती, गोष्ट या व्यक्तींनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही भाऊ दक्षिण पूर्व लंडनचे रहिवासी आहेत. हे प्रकरण गेल्या महिन्यात 12 मे रोजी घडली आहे. जेथे जेट-२०० विमान लंडनमधील स्टॅनस्टेड विमानतळावरून ग्रीसमधील क्रेते देशासाठी रवाना झाले होते.

रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, एअरलाइन्सने दोन्ही भावांवर ५० हजार युरो म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय या दोन्ही भावांना जेट-२०० फ्लाइटमधून प्रवास करण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

नक्की काय घडलं

फ्लाइटमधील एका प्रवाशाने या दोन्ही भावांमधील घटनेचा व्हिडीओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. मात्र, रेकॉर्डिंग करणाऱ्या प्रवाशाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये ग्रीक पोलीस अधिकारी एका भावाला फ्लाइटमधून खाली उतरवताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट स्टाफला दोन्ही भावांच्या सीटच्या खाली व्होडकाच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत, जे पिऊन हे दोघे भाऊ गोंधळ घालत होते.

या दोन्ही भावांनी फ्लाइटमध्येच एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्या फ्लाइटमध्ये बसलेल्या इतर 200 प्रवाशांना चांगलाच त्रास झाला. त्यांच्या भांडणामुळे आणि कृत्याने कंटाळलेल्या जेट-२ एअरलाइन्सच्या पायलटला विमान ग्रीसमधील क्रेटऐवजी कॉर्फू शहरात उतरवावे लागले जेणेकरून या दोन भावांना विमानातून बाहेर काढता येईल.

विमानातील या घटनेमुळे विमानाचे उड्डाण सुमारे साडेचार तास उशिराने झाले. कंपनीला देखील यामुळे नुकसान सहन करावे लागले. तसेच प्रवाशांची देखील गैरसोय झाली. ज्यामुळे या दोघांवर कंपनीने आरोप लावले आणि त्यांना जन्म भरासाठी बॅन केले आहे.