अमेरिकेत हिंसाचारात वाढ, शिकागो गोळीबारात 7 लोक जखमी तर एक गंभीर

गेल्या काही महिन्यांत अमेरिकामध्ये (US) गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. आशियाई वंशाच्या लोकांवर हल्ले वाढले आहेत. v

Updated: Apr 7, 2021, 09:27 AM IST
अमेरिकेत हिंसाचारात वाढ, शिकागो गोळीबारात 7 लोक जखमी तर एक गंभीर title=

शिकागो : गेल्या काही महिन्यांत अमेरिकामध्ये (US) गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. आशियाई वंशाच्या लोकांवर हल्ले वाढले आहेत. गेल्या महिन्यात अटलांटा, फिनिक्ससह बर्‍याच ठिकाणी गोळीबारांच्या घटनांमध्ये अनेक लोक ठार झाले. आता पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. यात सात लोक जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (US: 7 injured in firing in Chicago, one in critical condition)

अमेरिकेच्या शिकागोच्या (Chicago) दक्षिणेकडील एंगलेवुड येथे गोळीबारात 7 जण जखमी झाले. पोलिसांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे. ते म्हणाले की ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी सांगितले की गोळीबारात 39 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेमागील कारण स्पष्ट नाही

घटनेसंदर्भात मंगळवार सकाळपर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नव्हते. तसेच या प्रकरणाचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्या रविवारी शिकागोमध्ये इस्टर डेच्या दिवशी झालेल्या गोळीबारात कमीतकमी 10 लोक जखमी झाले होते.

अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांत वाढ

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत गोळीबार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात मार्चमध्ये बर्‍याच शहरांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या. अटलांटामधील तीन स्पा केंद्रांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली होती. या गोळीबारात 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 आशियाई वंशाच्या स्त्रियांचा समावेश होता. फिनिक्स शहरातील एका घराला लक्ष्य अंदाधुंद गोळीबार करण्याता आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या संसद भवनाच्या (US Parliament House, Capitol Hill) बाहेर एका संशयिताने हल्ला घडवून आणला होता. यावेळी संसदेच्या बाहेर असलेल्या दोन पोलीस जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  तर दुसऱ्या पोलिसाचा मृत्यू रुग्णालयात झाला. या पोलिसांनी दोन हात करताना यात हल्ला करणारा संशयित कार चालक ठार झाला होता. पोलिसांच्या कारवाईत त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या. संसद भवनाच्या बाहेर सुरक्षेचे बॅरिकेड तोडत कार चालकांने दोन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडले. यानंतर सुरक्षेसाठी कॅपिटल आवारात बंदी (Lockdown)घालण्यात आली आहे. कर्मचार्‍यांना आत किंवा बाहेरही पडण्याची परवानगी नाही.