अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. 

Updated: Nov 4, 2020, 03:25 PM IST
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : बायडेन आघाडीवर तर ट्रम्प पिछाडीवर  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात चुरशीची लढत सुरु आहे. बायडन यांना २३८ इलेक्ट्रोरल व्होट तर ट्रम्प २१३ जागांवर आघाडीवर आहेत.अमेरिकेत ५० पैकी २२ राज्यांचे निकाल हाती आले आहेत. इलेक्टोरल मतदानामध्ये ट्रम्प मागे पडले दिसून येत आहेत. ट्रम्प २१३ तर डेमोक्रेटचे उमेदवार बायडन २१० जागांवर आघाडीवर आहेत. 

अमेरिकेत शतकभरातले विक्रमी ६७ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणीत ट्रम्प आणि बायडन यांच्यात कांटे की टक्कर दिसून येत आहे. मतमोजणीत बायडन यांची आघाडी घेतल्याने ट्रम्प संकटात असल्याचे सध्या दिसून येत आहे.

अमेरिकन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरूच आहे. माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. बिडेन यांना आतापर्यंत २३८  मते मिळाली आहेत तर विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांना २१३ मतदार मते मिळाली आहेत. बहुमतासाठी २७० ची जादूचा आकडा आवश्यक आहे.

दरम्यान, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया, मिशिगन आणि विस्कॉन्सिन येथे मतमोजणी रखडली आहे. रात्री उशीरा आल्याने व्होट्टोची मतमोजणी थांबली. निकालाआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीत होणार्‍या गोंधळाविरूद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ असे ते म्हणाले. त्यांनी मोठ्या विजयाचा दावाही केला.

बायडेन यांनी न्यू मेक्सिको, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी, मेरीलँड येथे विजय मिळवला. कनेक्टिकट, डेलावेर, कोलोरॅडो आणि न्यू हॅम्पशायर यांनीही विजय मिळविला आहे. ट्रम्प फ्लोरिडामध्ये विजय मिळवला आहे. याव्यतिरिक्त ट्रम्प यांनी अलाबामा, मिसिसिप्पी, ओक्लाहोमा येथेही विजय मिळविला आहे. अमेरिकन निकालावर मत देताना निवडणूक विश्लेषकांनी असे म्हटले आहे की सुरुवातीच्या कल आणि निकालामध्ये बराच फरक असू शकतो. यामागचे कारण म्हणजे बहुतेक मतदान मेलद्वारे झाले आहे.