Video : आंघोळीचं नाव काढलं की तुम्हाला हुडहुडी भरतं, मग बघा 'ही' निन्जा टेक्निक

Hilarious Video : थंडी अनेकांना आंघोळ करण्याचा कंटाळा येतो. मग अशी वेळी अनेक जण आंघोळीपासून वाचण्यासाठी शक्कल लढवतात. एका तरुणाची आंघोळीची  निन्जा टेक्निकचा व्हिडीओ (Ninja Technique of Bathing in Winters) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Updated: Nov 24, 2022, 08:58 AM IST
Video : आंघोळीचं नाव काढलं की तुम्हाला हुडहुडी भरतं, मग बघा 'ही' निन्जा टेक्निक  title=
video Ninja Technique Bathing In Winter Funny video viral on social media nmp

Bathing In Winter Funny Video : राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी (Nashik) नाशिकच्या ओझरमध्ये (Ozar) नोंदवण्यात आलं आहे. अशात अनेक जण थंडीला घाबरुन आंघोळ करण्याचे टाळतात. उन्हाळ्यात दोनदोनदा आंघोळ करणारेही थंडी मात्र आंघोळीचं (bath) नाव काढलं तरी त्यांना हुडहुडी भरते. काही लोक थंडीत आंघोळ न करण्याचे अनेक बहाणे शोधून काढतात. ही लोकं आंघोळ न करताही राहू शकतात. पण घरातील मंडळी ओरडतात मग काय आंघोळ करण्यापासून पर्याय उरतं नाही. मग काय थंडीतही थरथरत अंगावर पाणी ओतावं लागतं. 

पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे. या व्हिडीओमधील तरुणाने तुम्हाला थंडीत आंघोळ कशी करायची यासाठी भन्नाट आयडिया सुचवली आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

आंघोळसाठी निन्जा टेक्निक (Ninja Technique of Bathing) 

हा व्हिडीओ अनेकांना स्वत:शी जोडतोय. अनेक वेळा तुम्ही पण अशी आंघोळ केली असेल. म्हणून की काय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये एक तरुण आंघोळी जातो तरी खरी...पण तो थंडीत आंघोळ न करण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढतो.

हेही वाचा - हॉस्पिटलच्या गार्डने चक्क भूतासाठी उघडलं दार, Video पाहून अंगावर येतो काटा
 

तो आंघोळीसाठी पाण्याचा वापर तर करतो पण अंगावर न टाकता...आता तुम्ही म्हणाल असं काय...तर तुम्हीच बघा हा व्हिडीओ...(video Ninja Technique Bathing In Winter Funny video viral on social media)

मजेदार व्हिडीओ व्हायरल (funny video viral)

बघितली थंडीतील आंघोळ...या तरुणाची आंघोळ अनेकांना आपल्या आंघोळीची आठवण करुन देतं आहे. हो ना...आपल्यापैकी कित्येक जणांनी कधी ना कधी अशी आंघोळ केली असेल ना..असो हा गंमतीचा भाग आहे. हा मजेदार व्हिडीओ @tololmeroket नावाच्या अकाऊंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे.