Video: लाईव्ह कॅमेरासमोर पत्नीचं मुंडन केलं, नंतर पतीने स्वत:चेही केस कापले... कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

Trending News : इंटरनेटेवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओत पतीने आधी पत्नीचं मुंडन करताना दिसत आहे, नंतर स्वत:चेही केस कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशव मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वास्तविक या व्हिडिओ मागचं कारण ऐकल्यावर तुम्हाालाही अश्रू आवरणार नाहीत. 

राजीव कासले | Updated: Sep 4, 2023, 11:20 PM IST
Video: लाईव्ह कॅमेरासमोर पत्नीचं मुंडन केलं, नंतर पतीने स्वत:चेही केस कापले... कारण वाचून डोळ्यात पाणी येईल title=

Viral Video : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले काही व्हिडिओ आपण विसरून जातो. तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात. काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पती आपल्या पत्नीचं मुंडन (Husband Shaves Head) करताना दिसत आहे. पती केस कापत असताना पत्नीच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहातायत. पत्नीचे केस कापल्यानंतर पती स्वत:चे केसही कापताना या व्हिडिओत दिसत आहे. 

भावूक करणारा व्हिडिओ
सोशव मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ भावूक करणारा आहे. वास्तविक या व्यक्तीची पत्नी कँसरग्रस्त (Cancer) आहे. उपचारासाठी पतीने तिचं मुंडन केलं. पण तिच्या दु:खात आपण सोबत आहोत, तिची हिम्मत वाढवण्यासाठी पतीनेह स्वत:ही टक्कल केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर Good News Movement नावाने शेअर करण्यात आला आहे. 

व्हिडिओला एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात म्हटंलय. 'कोणीही एकटे लढत नाही;  पत्नीला पाठिंबा दर्शविण्यासाठी, या पतीने कर्करोगाशी लढा देत असलेल्या पत्नीसोबत आपण आयुष्यभर असल्याचा संदेश दिला आहे. 

व्हिडिओच्या शेवटी एका लहान मुलाचे फोटो आहेत. कँसरग्रस्त होण्याआधी या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.6 मिलिअनहून अधिका लोकांनी पाहिला आहे. तसंच या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही नोंदवल्या आहेत. लाखो लोकांनी जोडप्याा आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

युजर्सचा पाठिंबा
या व्हिडिओवर एका युजरने खूपच भावूक करणारी अनुभव सांगितला आहे.  या युजरने म्हटलंय. मी अनेक वर्षंपासून एका कर्करोग संस्थेत काम केलं आहे. एका प्रकरणात एक व्यक्ती आपल्या पत्नीचा कॅन्सरवर उपचार करण्यासाठी त्या संस्थेत आला होता. पण त्या व्यक्तीने केस खूपच विचित्र होते. त्याने आपले केस निळ्या चमकदार रंगाने रंगले होते. याबाबत त्याला विचारण्यात आलं. यावर त्याने सांगितलं कॅन्सरमुळे माझ्या पत्नीचे केस गळतायत, त्यामुळे कुठेही गेल्यावर लोकांची नजर तिच्या केसावर जाण्याआधी माझ्या केसावर जाते आणि तिच्याकडे दुर्लक्ष होतं. 

मेक्सकोत विचित्र अपघात
दरम्यान मेक्सिकोत (Mexico) एक विचित्र घटना समोर आली आहे. एका जोडप्याने ग्रँड पार्टी आयोजन केली होती. एका मोठ्या गार्डनमध्ये ही जेंडर रिवील पार्टी (Gender Reveal Party) आयोजित करण्यात आली होती. यात अनेक पाहुणे सहभागी झाले होते. एका मोठ्या फ्लेक्ससमोर हे जोडपं उभ होतं. या जोडप्यावर एक प्लेन जातं आणि त्यातून गुलाबी रंगाचा धूर सोडण्यात येतो आणि येणाऱ्या बाळाचं जेंडर रिव्हील करण्यात येतं. पण प्लेन काहीसं पुढे गेल्यानंतर जमिनीवर आपटतं आणि यातल्या पायलटचा या दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू होता. या घटनेवर मेक्सिकोत जोरदार टीका केली जात आहे.