विचित्र काम करून महिला कमावते लाखो रुपये, स्वतःला म्हणते 'Farting Queen'

ती यासाठी परमेसन चीज खाते, जे तिच्या फार्ट्सला 'सल्फरी' बनवते.

Updated: Aug 30, 2021, 07:08 PM IST
विचित्र काम करून महिला कमावते लाखो रुपये, स्वतःला म्हणते 'Farting Queen' title=

लंडन : काही व्यक्तींकडे अशी एक कला असते, जी या जगात कोणालाच येत नाही. त्यांच्या या यूनिक कलेमुळेच अशा लोकांना जगभरात प्रसिद्धी देखील मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का जगात एक अशी महिला आहे जी, तिच्या गॅस बाहेर काढण्याच्या कलेमुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे. तसे पाहाता
गॅस येणे हे नैसर्गीक आहे. प्रत्येक व्यक्तीला ते होतातच. परंतु यामुळे कोणाला प्रसिद्धी मिळू शकते हे आपल्याला पचवणे थोडं कठीण आहे. परंतु हे खरे आहे.

लश बोटॅनिका, एक अमेरिकन महिला, जी एक यूट्यूबर आणि एडल्ट स्टार (Adult Star) देखील आहे, तिने सांगितले की, तिने तिच्या गॅसचा आवाज ऑनलाईन विकून त्यातून 25 हजार डॉलर्स म्हणजे 18 लाख रुपये कमावले आहे. चॅनेल 4 ला दिलेल्या मुलाखतीत, लशने सांगितले की, हे सर्व तेव्हा सुरू झाले जेव्हा एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला आणि तिला फार्ट व्हिडीओ बनवण्यास सांगितले.

तथापि, लश बोटानिकाने एका यूट्यूब व्हिडीओमध्ये सांगितले की, ती कॅमेरासमोर गॅस सोडण्यासाठी तयार नव्हती, परंतु तरीही मग तिने प्रयत्न केला. त्यानंतर या  व्हिडीओला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली आणि नंतर इतर अनेक लोकांकडून फार्ट व्हिडीओची मागणी करण्यात आली, ज्यासाठी ते पैसे देण्यासही तयार होते.

चॅनेल 4 च्या मुलाखतीत, लशने उघड केले की, एक दिवस असा होती, त्यादिवशी तिने फार्ट व्हिडीओ बनवून दिवसाला 4 हजार डॉलर कमवले. परंतु लश ने सांगितले की, इतक्या वेळा फार्ट करणे तिच्यासाठी सोपे काम नाही.

लशने असेही म्हटले की, तिला अशा वेगळ्या प्रकारचे फार्ट करण्यासाठी तिला पनीरसह अनेक दुग्धजन्य पदार्थ खाण्याची गरज लागते. हेच कारण आहे की, ती एक फार्ट व्हिडीओसाठी175 डॉलर्सपर्यंत चार्ज करते. म्हणजेच एका व्हिडीओमागे ती 12 हजार रुपयांपर्यंत कमावते.

मुलाखतीत, लॅशने तिच्या फार्ट्सबद्दल स्पष्ट केले की, ती यासाठी परमेसन चीज खाते, जे तिच्या फार्ट्सला 'सल्फरी' बनवते. तसेच ती मोझारेला चीज देखील खाते ज्यामुळे तिच्या फार्टला 'बबली' आवाज मिळतो.

लश बोटानिकाने स्वत: विषयी सांगितले की ती जार किंवा एकद्या वस्तूवर फार्ट करुन त्याला ती विकते, तिने तिचा एक अनुभव सांगितला की, तिने एकदा एका ग्राहकासाठी चवीसाठी त्याच्या लॉलीपॉपवर फार्ट केले होते. ज्यासाठी तिने पैसे देखील घेतले आहे.

लशच्या या वेगळ्या गोष्टीमुळे ती सर्वत्र फार्टींग क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिला त्याच नावाने लोक ओळखतात.