video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

Husband give donkey as gift in Wedding: सध्या एका लग्नात एक अजब प्रकार झालेला पाहायला मिळाला आहे. नवऱ्यानं चक्क आपल्या होणाऱ्या नवरीला चक्क गाढव म्हणून भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ (viral donkey wedding gift video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Updated: Dec 10, 2022, 02:07 PM IST
video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!  title=
viral video news

Husband give donkey as gift in Wedding: गाढव (donkey) हा प्राणी जरी आपल्या सर्वांना ज्ञात असला तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण गाढव या शब्दाचा वापरही अनेकदा करत असतो. अनेकदा शिवी देण्यासाठी वापरतो किंवा कोणासोबत गंमत करतानाही आपण या शब्दाचा वापर करतो. याचा अर्थ असा की आपली अशी समज असते की गाढव हा जगातील सर्वात मुर्ख (stupid) प्राणी आहे. म्हणून कोणाला मुर्ख म्हणण्यासाठी किंवा कोणाचा मुर्खपणा दर्शवण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला थेट मुर्ख म्हणण्यापेक्षा गाढवचं जास्त म्हणतो. परंतु गाढव हा मुर्ख प्राणी आपण समजत असलो तरी तो प्राणी हा सगळ्यात जास्त मेहनती आहे. तेव्हा अनेकदा हमालीसाठी आपण गाढवाचा वापर करून घेतो. असं असलं तरी आपण काही गाढव पाळणार नाही. परंतु एका लग्नात मात्र एक अजब प्रकार घडला आहे. एका लग्नात नववधूला (newly wedding) सरप्राईज म्हणून चक्क गाढवचं भेट म्हणून दिलं आहे. (viral video a bridegroom gives donkey as a wedding gift to his newly wed wife)

हा प्रकार पाहून नववधूला सुरूवातीला प्रचंड धक्का बसला परंतु नंतर तिच्या नवऱ्यानं तिला अशी भेट लग्नात देण्याचं खरं कारण विचारलं तेव्हा चक्क तिनं त्या गाढवाला मिठीच मारली. असं त्यानं तिला काय सांगितलं की चक्क तिनं त्या गाढवाला मिठीच मारली. हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असलाच. सध्या हा व्हिडीओ (viral video on social media) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून सगळीकडे हास्याचे फवारे उडाले आहेत. 

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या एका प्राणीपेमीनं हा व्हिडीओ (video on instagram) आपल्या इन्टाग्राम पोस्टवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की आपल्या बायकोला नवऱ्यानं गाढव भेट म्हणून दिली आहे. परंतु त्यानं आपल्या बायकोला का म्हणून अशी भेट दिली याबद्दल सर्वप्रथम कोणाला काहीच कळत नाही. तेव्हा जाणून घेऊया याची दोन उत्तरं काय आहेत. पहिलं कारण असं आहे की गाढवाची पिल्लं त्या वधूला खूप आवडतात आणि दुसरं कारण म्हणजे तिच्यामते हे जगातील सर्वात गोंडस आणि मेहनती प्राणी आहे. 

या व्हिडीओत वधूचं आणि वराचं संभाषणही आहे ज्यात ती त्याला म्हणते की, मी तूला असं गाढव होऊ देणार नाही. हे ऐकताच सगळीकडून हास्याचे फव्वारे उडू लागले आहेत. ज्यानं हा व्हिडीओ (viral trending video) शेअर केला आहे तो इन्टाग्रामर म्हणतो की त्याने गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे केलं नाही पण तीही त्याच्यासोबत आली आहे. या दोघांना त्याच्या आईनं 30 हजार रुपयांना विकत घेतलं होतं. आता त्यांना कोणतीही मजुरी करावी लागणार नाही असे त्याचे म्हणणे आहे. ते शेतात आनंदाने जगतील. आमच्याबरोबर खूप खातील, पितील आणि खेळतील. 

आपण प्राणी प्रेमी असल्यानं आपल्यासोबत फारशी कोणी मुली लग्नासाठी तयार होत नाहीत, असं हा व्हिडीओ शेअर (video sharing) करणाऱ्या आणि लग्नातील नवरदेवानं व्हिडीओत सांगितले आहे. परंतु आपल्या या होणाऱ्या बायकोला गाढव फार आवडते हे ऐकून तिची आणि माझी ओळख वाढली. आमच्या दोघांचे त्यामुळे ट्यूनिंग झाले. योगायोगानं तिच्या आईलाही गाढव हा प्राणी आवडतो. म्हणून सरप्राईझ म्हणून मीही लग्नाला प्रेझेंट म्हणून गाढवांचे पिल्लू गिफ्ट केले. हा व्हिडीओ संपवताना नवरदेवानं आवाहनही केले की ही आमची आवड आहे आणि कृपया त्याची मस्करी करू नका. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर त्याच्या या मजेदार भेटीवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका यूजरने लिहिले की, बायका आपल्या पतीला गाढव म्हणून पाहतात. गिफ्टसाठी ऐवढी मेहनत करायची काय गरज होती. दोन महिने वाट बघितली असती तर बायकोच्या नजरेत तो स्वतःच गाढव झाला असता. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, जर आमच्या बायकाही अशाच मागण्या करू लागल्या तर आम्ही त्या कशा पूर्ण करणार? सध्या हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल (viral news) होतो आहे.