Video : OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स...

Viral Video : बहिणीच्या लज्जास्पद कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोल्ड कपडे घालून  Water Park मध्ये या तरुणीने आपल्या भावाच्या अस्थीचं विसर्जन केलं. 

Updated: Sep 17, 2023, 02:48 PM IST
Video : OMG! बहिणीने Water Park मध्ये केलं भावाच्या अस्थीचं विसर्जन, अन् त्यानंतर केला डान्स... title=
Viral Video woman spreads brother ashes in water park and Started dancing Trending News

Viral Video : सोशल मीडियावर विचित्र आणि धक्कादायक असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. एका बहिणीचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. बहीण भावाचं नातं जगातील सर्वात सुंदर नातं असतं. या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या व्हिडीओमधील महिलेने आपल्या भावाच्या अस्थी एका  Water Park मध्ये जाऊन विसर्जीत केल्या आहेत. (Viral Video woman spreads brother ashes in water park and Started dancing Trending News )

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचं अस्थी विसर्जन केलं जातं. ही एक धार्मिक प्रथा असून त्याला अतिशय महत्त्व आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्माला शांती मिळावी म्हणून अनेक विधी केल्या जातात. त्यातील अस्थी विसर्जन ही एक विधी आहे. धार्मिक स्थळी असलेल्या नदीत अस्थी विसर्जन केलं जातं. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने Water Park अस्थी विसर्जन केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हॉट असा काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली एक महिला  Water Park मध्ये आहे. तिच्या मागे असंख्य लोक दिसत आहेत. या पार्कमध्ये सुरु असलेल्या गाण्यावर ती थरकताना दिसत आहे. त्याच्या हातात एक छोटीशी बाटल दिसत आहे. या बाटलमध्ये तिच्या भावाच्या अस्थी आहेत. तिने जरा वेळाने ती बाटल उघडली आणि  Water Park मधील स्विमिंग पूलमध्ये विसर्जित केली. 

ती एवढ्यावरच थांबली नाही त्यानंतर ती Water Park मधील स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसून आली. बहिणीने नात्यासंबंधातील सर्व मर्यादा ओलांडल्याचं दिसून येतं आहे. तिने केलेल्या कृत्याचं तिला जराही पश्चाताप होत असल्याच तिच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे. 

ही घटना स्पेनच्या इबिझा क्लबमधील आहे. ट्वीटर म्हणजे X वरील M या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.