या महिलेला जगातील सर्वात विचित्र आजार; तब्बल 40 वर्षांपासून झोपलीच नाही

चीनमध्ये राहणारी एक महिला गेल्या 40 वर्षांपासून 1 क्षणासाठीही झोपलेली नाही. हे वृत्त सध्या जगभरात व्हायरल होत आहे.

Updated: Sep 5, 2021, 09:15 AM IST
या महिलेला जगातील सर्वात विचित्र आजार; तब्बल 40 वर्षांपासून झोपलीच नाही title=

नवी दिल्ली :  आतापर्यंत तुम्ही असे लोक पाहिले असतील की, ते रात्री व्यवस्थित  झोप झाली नसेल तर चिडचिड करतात.  अनेक लोकं असे असतात की, ज्यांना दिवसासुद्धा थोडी झोप घ्यायला आवडते. परंतु चीनमध्ये राहणारी एक महिला गेल्या 40 वर्षांपासून 1 क्षणासाठीही झोपलेली नाही. हे वृत्त सध्या जगभरात व्हायरल होत आहे.

झोप न येण्याने हैराण
चीनच्या हेनान प्रांतात राहणारी ली ज्हानयिंग झोप न येण्याच्या आजाराने त्रस्त आहे. या वेळी त्यांचे वय 45 -46 वर्ष आहे. त्यांचा दावा आहे की, ते मागील 40 वर्षापासून 1 मिनिट देखील झोपलेल्या नाही. जेव्हा त्या 5-6 वर्षाच्या होत्या तेव्हा त्या शेवटचं  झोपल्या होत्या.

लग्नानंतर पती लियू सुओक्विनने या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत त्यांनी आपल्या पत्नीला झोपतांना पाहिलेले नाही. एवढेच नाही तर रात्री टाइमपास करण्यासाठी ती घरातले कामं करीत राहते. सुरवातीला ली ने झोप येण्यासाठी गोळ्या घेतल्या. परंतु त्यांचा काहीही फायदा झाला नाही.

ली आपल्या गावात खूपच लोकप्रिय आहे. अनेकवेळा आजुबाजूचे तिला खरंच झोप नाही येत का हे पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर पत्ते किंवा बैठे खेळ खेळतात. खुप वेळानंतर त्यांचेच डोळे लागतात. परंतु ली झोपत नाही.  अनेक डॉक्टरांचे उपचार घेऊन देखील त्यांना आजपर्यंत काही फायदा झालेला नाही.