'या' देशांमध्ये नवं विवाहित जोडप्यांना कराव्या लागतात अशा गोष्टी

ऐकावं ते नवलंच! 'हे' आहेत जगातील भन्नाट वेडिंग ट्रेडिशन   

Updated: Sep 10, 2022, 02:53 PM IST
'या' देशांमध्ये नवं विवाहित जोडप्यांना कराव्या लागतात अशा गोष्टी title=

Wedding Tradition : फक्त भारतातच नाही प्रत्येक देशामध्ये वेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. भारतात लग्नात ज्याप्रमाणे नवऱ्या मुलाचे बूट चोरणं एक परंपरा आहे. त्याच प्रमाणे इतर देशांमध्ये देखील अनेक परंपरा आहेत. नवऱ्या मुलाचे बूट चोरणं आपल्यासाठी सामान्य गोष्ट आहे. पण दुसऱ्या देशातील लोकांसाठी थोडं वेगळं असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजात किंवा देशात अशी काही परंपरा असते, ज्या विचित्र असतात आणि त्यामुळे आपल्याला थोडं वेगळं वाटतं. अशाचं विधींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Weirdest Wedding Traditions)

- फ्रान्सची ही फार जुनी परंपरा आहे. त्या परंपरेला Charivari असं म्हणतात. लग्नाच्या रात्री, मित्र आणि नातेवाईक भांडी घेऊन जोडप्याचा दरवाजा ठोठावतात आणि जोडप्याला बाहेर जाऊन नातेवाईकांना पेय आणि नाश्ता द्यावा लागतो. (Weirdest Wedding Traditions Around The World)
 
- स्कॉटलंडमध्ये कचरा आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी नव्या जोडप्यावर टाकल्या जातात. आयुष्यातील सर्व वाईट परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोघांची तयारी असावी म्हणून वधू आणि वरावर कचरा टाकला जातो. 

- चीनमध्ये लग्नाच्या एक महिना आधी नववधूला रोज तासभर रडावं लागतं. बाकी घरातील लोकही मुलीसोबत एकत्र रडतात. (Marraige)

- वेल्समध्ये देखील लग्नानंतर नवरा-नवरीला एक विधी करावी लागते.  यामध्ये वर आपल्या नववधूला प्रेमाचा चमचा देतो, ज्यामध्ये तो मुलीला आश्वासन देतो की तो तिला कधीही रिकाम्या पोटी झोपू देणार नाही आणि तिच्या सर्व गरजांची काळजी घेईल.