पाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा?

विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे?

Updated: Mar 2, 2019, 10:32 PM IST
पाकिस्तानपासून वाघा बॉर्डरपर्यंत अभिनंदन सोबत आलेल्या त्या महिला कोण, त्यांच्याबाबत होत आहे चर्चा? title=

नवी दिल्ली : पाकिस्तान सैन्याने आपल्या ताब्यात घेतलेले भारतीय विंग कमांडर अभिनंदन 60 तासानंतर भारतात परतलेत. त्यांना अटक झाल्यानंतर रात्री 9.20 वाजता पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात दिले. यावेळी त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. ही महिला कोण याचीच चर्चा सुरु होत आहे. ही महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. लोक असे मानत आहेत की, ती त्यांची पत्नी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहे. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. प्रत्यक्षात त्या महिला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील एक अधिकारी असून त्यांचे नाव डॉ. फरिहा बुगती आहे.

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात

डॉ. फरिहा बुगती - 

डॉ. बुगती या पाकिस्तानातील परराष्ट्र कार्यालयतील प्रमुख अधिकारी आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध संभाळण्याची प्रमुख जबाबदारी आहे. त्यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बरोबरीने संबंध हाताळण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. ( भारतातील आयएफएसच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर त्यांचे पद आहे.) पाकिस्तानात तुरूंगात ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांच्या अटक प्रकरण हाताळण्यासाठी असलेल्या मुख्य पाकिस्तानी अधिकाऱ्यांपैकी त्या एक अधिकारी आहेत. कुलभूषण जाधव यांच्यावर भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी इस्लामाबादमध्ये त्यांच्या आई आणि पत्नी जाधव यांच्यात झालेल्या बैठकी दरम्यान डॉ. बुगती या उपस्थित होत्या.

दरम्यान, पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने सांगण्यासाठी व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची भारतात आता वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.