रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा

 कक्षा बदलताना लुना-25 आपत्कालीन परिस्थितीत अडकले. यानंतर लूना-25 चंद्रावर आदळले आहे. 

Updated: Aug 20, 2023, 11:39 PM IST
रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? धक्कादायक खुलासा title=

Luna-25 crash : रशियाची चंद्रमोहिम फेल झाली आहे. चंद्रावर लँडिग करण्याआधीच रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले आहे. 19 ऑगस्ट रोजी 05:27 वाजता Luna-25 चा संपर्क तुटला. Luna-25 यान भरकटले. Luna-25 मोहिमेवर काम करणारी टीम यान कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र. त्यांना यात यश आले नाही.  रशियाचे लुना-25 यान चंद्रावर का कोसळले? चंद्रमोहिम फेल का झाली? या बाबत आता धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 

भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता  Luna-25 अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून  रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणि अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने  हे यान प्रक्षेपित करण्यात आले.  Luna-25 लँडरला 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते. मात्र, त्याआधीच हे यान चंद्रावर क्रॅश झाले आहे. 

रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश का झाले?

रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने यान क्रॅश झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Luna-25 लॅँडर  21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार होते. 19 ऑगस्टला  दुपारी 14:10 वाजता रशियाच्या  Luna-25  लँडरला प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये ढकलण्यासाठी अंतिम डी-बूस्ट करण्यात आले. मात्र, डी-बूस्टची कमांड या लँडरला मिळाली नाही. यानंतर लूना-25 कक्षा बदलण्याताना अयशस्वी झाल्याने त्यामुळे ते भरकटले. Roscosmos यान क्रॅस का झाले याबाबत खुलासा केला आहे. लँडिगच्या आधी लँडर अनपेक्षित कक्षेत गेले. यामुळे अति वेगात असलेले  Luna-25  लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.

पहिला मानव अवकाशात पाठवणाऱ्या रशियाची  चंद्रमोहिम फेल 

1961 मध्ये रशियाने युरी गागारिन या नावाने पहिला मानव अवकाशात पाठवण्याचा पराक्रम केला होता. तब्बल 47 वर्षानंतर हाती घेतलेली चंद्रमोहिम फेल ठरली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष रशियाच्या या सुपरफास्ट चंद्रमोहिमेकडे लागले होते. Luna-25  लँडर;s दक्षिण ध्रुवावर लँडिंग केले जाणार होते. त्या भागातील चंद्राच्या पृष्ठभागावरील गोठलेल्या बर्फाचा अभ्यास हे यान करणार होते.