Christmas 2023 : येशू ख्रिस्तांच्या जन्मस्थळी शुकशुकाट, ना सेलिब्रेशन ना सांताक्लॉज; पाहा नेमकं कारण काय?

Bethlehem canceled Christmas celebrations : बेथलेहेम शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातून लोक याठिकाणी चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी येतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लोकांना गुन्हेगारांप्रमाणे लपून रहावं लागत आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 25, 2023, 06:41 PM IST
Christmas 2023 : येशू ख्रिस्तांच्या जन्मस्थळी शुकशुकाट, ना सेलिब्रेशन ना सांताक्लॉज; पाहा नेमकं कारण काय? title=
Bethlehem canceled Christmas, jesus christ birthplace

Silence In Bethlehem : संपूर्ण जगात आज ख्रिसमस (Christmas 2023) मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी ख्रिसमसाठी खास सजावट देखील केली जातीये. तर काही देशात वेगवेगळ्या परंपरेनुसार गिफ्ट्स देऊन अन् जल्लोषात ख्रिसमस साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पहायला मिळतंय. अशातच प्रभू येशूचे जन्मस्थळ (Jesus Christ Birthplace) असलेल्या बेथलेहेम शहरात मात्र शुकशुकाट पहायला (Bethlehem canceled Christmas celebrations) मिळतोय. तिथं दरवर्षी मोठ्या संख्येने लोक जमा होता. मोठ्या आवाजात गाणी म्हणतात, त्याच बेथलेहेम शहरातील रस्त्यांवर शांतता ऐकू येत आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे? पाहुया...

प्रभू येशू यांचा जन्म बेथलेहेम (Bethlehem) शहरात झाल्याचं ख्रिश्चन धर्मीय मानतात. त्यावरून काही वाद देखील आहेत. तुमच्या माहितीसाठी बेथलेहेम हे शहर पॅलेस्टिनी शहर आहे आणि सध्याच्या परिस्थितीत हे शहर हमास आणि इस्राइल युद्धामुळे (israel hamas war) हे शहर ओसाड पडलंय. सततचा गोळीबार आणि बॉम्ब हल्ल्यामुळे हे शहरतील जनजीवन विस्खळीत झाल्याचं पहायला मिळतंय. ज्या रस्त्यांवर लोक आनंदाचे नाचायचे, त्याच ठिकाणी आता लष्कराच्या रणगाड्यांचा आवाज ऐकू येतोय. 

बेथलेहेम शहराची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. जगभरातून लोक याठिकाणी चर्च ऑफ द नेटिव्हिटी पाहण्यासाठी येतात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लोकांना गुन्हेगारांप्रमाणे लपून रहावं लागत आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 20 हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वाईट ख्रिसमस आहे. बेथलेहेम शहर बंद असल्याने या वर्षी येथे ख्रिसमसच उत्साह नाही, त्यामुळे आता हिरमोड झाल्याची भावना शहरातील लोकांनी व्यक्त केली आहे.

नेतान्याहूंच्या पत्नीचं पोप फ्रान्सिस यांना पत्र

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पत्नी सारा नेतान्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून युद्धात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची बिनशर्त सुटका करण्यासाठी पोप यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी विनंती सारा नेतान्याहू यांनी केली आहे. त्यामुळे आता पोप काय निर्णय घेणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.