नटण्याथटण्यासाठी अज्ञात व्यक्ती देतात महिलेला पैसे, 7000 पुरुषांच्या पैशातून करते वर्ल्ड टूर!

FinDomme: गंमत म्हणजे तिला हे पैसे अज्ञात व्यक्ती देतात आणि तेही काही न करता. 

Updated: Oct 4, 2022, 04:05 PM IST
नटण्याथटण्यासाठी अज्ञात व्यक्ती देतात महिलेला पैसे, 7000 पुरुषांच्या पैशातून करते वर्ल्ड टूर!  title=
Woman became rich without doing anything nmp

Woman Story : जीवनातील संघर्ष करुन उंच शिखरावर जाणाऱ्या महिलांचा यशोगाथा (womens success story) आपण पाहिला आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक महिलेची जोरदार चर्चा सुरु आहे. आयुष्यात काही न करता ही महिला लाखो रुपये आपल्या नटण्याथटण्यावर खर्च करते. (Men give money to woman to become beautiful) गंमत म्हणजे तिला हे पैसे अज्ञात व्यक्ती देतात आणि तेही काही न करता. हो खरंच या महिलेला काही न करताही अज्ञात व्यक्ती लाखो रुपये देतात. (Men Give Millions to Woman for Free)

विचित्र छंद ठेवणाऱ्या पुरुषांना ही महिला गंडवते आणि त्यांचाकडून लाखो रुपये लंपास करते. डायमंड डीवा प्रिंसेस (Diamond Diva Princess) असं या महिलेचं नाव आहे. डायमंड नावाची ही महिला एक फिनडोम (FinDomme) आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, फिनडोम म्हणजे अशा महिला ज्या Financial Domination चं काम करतात. हे एक प्रकारचे Fetish Lifesytle आहे. अशा महिला श्रीमंत लोकांना आवडतात, ज्या त्यांचा पैशांवर दावा करतील आणि त्यांचे पैसे जबरदस्ती उकळतील. असे पुरुष फिनडोम महिलांवर लाखो रुपये खर्च करतात. या पैशांसाठी हे पुरुष त्या महिलांकडून शारीरिक संबंध ठेवतात किंवा काही पुरुषांना त्यांचाकडून काहीच नको असतं. (Woman became rich without doing anything nmp)

अशीच सवय असलेल्या किंवा असा छंद असलेल्या पुरुषांचा या महिला फायदा घेतात. द सनच्या रिपोर्टनुसार डायमंड अशाच 7 हजार अनोळखी श्रीमंत लोकांकडून पैसे लुटते, ज्यांना तिला फक्त सुंदर दिसलेलं पाहायचं आहे. 

आपलं खरं नाव न सांगता 2004 पासून ती फिनडोम म्हणून काम करत आहे. याआधी ती मॉडेल होती. अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरोशी लोक तिची तुलना करतात. 1 नोव्हेंबर ते 2 जानेवारी ती डायमंड प्रिसेसमस नावाचं ख्रिसमससारखं एक फेस्टिव्हल ठेवते. ज्यात पुरुष तिला गिफ्ट देतात. लोकांना आपल्यावर पैसे उडवायला मजा वाटते, असं ती म्हणते.