Worlds Longest Train: जगातील सर्वात लांब ट्रेन, फोटो पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

जगातील सर्वात लांब रेल्वे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.

Updated: Nov 1, 2022, 06:11 PM IST
Worlds Longest Train: जगातील सर्वात लांब ट्रेन, फोटो पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही title=

Worlds longest passenger train : जगातील सर्वात लांब ट्रेन तुम्ही याआधी कधी पाहिली नसेल. जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंड (Switzerland) या देशाने ही रेल्वे सुरु केलीये.  रेहतियन रेल्वे (Rhaetian Railway) कंपनीने ही रेल्वे सेवा सुरु केली आहे. ज्यामध्ये जवळपास 100 कोच आहेत. ही रेल्वे जवळवास 2 किलोमीटर लांब आहे. सर्वात लांब रेल्वे सुरु केल्याने त्याची गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली आहे.

जगातील ही सर्वात सुंदर रेल्वे सर्वात सुंदर जागेवरुन चालवली जात आहे. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करत असताना प्रवाशांना सुंदर निसर्गाचा देखील आनंद घेता येणार आहे. जगातील सर्वात लांब रेल्वेचा रेकॉर्ड यामुळे स्वित्झर्लंडच्या नावावर नोंद झाला आहे. या रेल्वेची बैठक क्षमता 4550 सीटची आहे. ही रेल्वे 7 ड्रायव्हर एकत्र एकमेकांच्या क्वार्डिनेशनचे चालवत आहेत. स्वित्झर्लंडमध्ये आता तुम्हाला या रेल्वेचा आनंद घेता येणार आहे.

ही रेल्वे प्रवासादरम्यान 22 बोगदे आणि 48 पुलांवरुन चालते. हा रुट आपल्या सौंदर्यामुळे जगभरात चर्चेत आहे. कोरोना काळात या रुटवर चालणाऱ्या गाड्या जवळपास बंद होत्या. यामुळे 30 ते 35 टक्के उत्पन्न कमी झालं होतं.  ज्यामुळे आर्थिक फटका बसला. आता कंपनीला अशा विश्वास आहे की, रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर जगभरातील पर्यटक या ठिकाणी येतील.

हा संपूर्ण प्रवास करण्यासाठी 1 तासाहून अधिक वेळ लागतो. लोकं या रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता उत्सूक दिसत आहे. या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.