Year End 2018 VIDEO : हे आहेत यंदाचे व्हायरल सेलिब्रिटी

पाहा या व्हिडिओंमुळे त्यांना मिळाली होती लोकप्रियता....

Updated: Dec 31, 2018, 02:32 PM IST
Year End 2018 VIDEO : हे आहेत यंदाचे व्हायरल सेलिब्रिटी title=

मुंबई : यंदाच्या वर्षी सोशल मीडियाने विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं. मग ते कलाविश्व असो किंवा आंतरारष्ट्रीय राजकारण. अनेक अशा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या ज्या पाहता नेटकऱ्यांनीही त्यांना उचलून धरलं. सांताक्लॉजचं रुप धारण करुन अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या अमोरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून, नजरेच्या बाणाने अनेकांनाच घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरपर्यंत अनेकांचेच व्हिडिओ यंदाच्या संपूर्ण वर्षभरात खऱ्या अर्थाने गाजले. चला तर मग आढावा घेऊया अशाच काही धमाल आणि व्हायरल झालेल्या अफलातून व्हिडिओंचा...

माणिक्य मलरया पूवी...
'ओरू अदार लव्ह' या चित्रपटातील 'माणिक्य मलरया पूवी' या गाण्याचा व्हिडिओ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होण्यापूर्वी, त्याच गाण्याची अवघ्या काही सेकंदांची ध्वनिचित्रफीत सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली. मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्या नजरेचा बाण आणि तिचं स्मितहास्य या व्हिडिओच्या लोकप्रियतेचं कारण होतं.

डान्सिंग अंकल... 

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या एका गाण्यावर लग्नसोहळ्यात नृत्य करणाऱ्या एका काकांचा व्हिडिओ यंदा चर्चेचा विषय ठरला. वय हा फक्त आकडा आहे... हेच जणू या काकांचं नृत्य पाहून अनेकजण म्हणाले. त्यांचा अनोखा नृत्याविष्कार पाहून नेटकऱ्यांनीच त्यांना डान्सिंग अंकल असं नाव दिलं. 

#Couple_Goals देणारी ही एव्हरग्रीन जोडी... 

अनेक नेटकऱ्यांकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एका समारंभादरम्यान पंजाबी  काका- काकू सुरेख असा कपल डान्स करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये अतिशय नजाकतीने नाचणाऱ्या काकूंनी साडी नेसलेली असूनही तितक्याच सराईतपणे त्या आपलं कौशल्य सादर करत आहेत. तर काकांचं नृत्यावर असणारं प्रभुत्वंही व्हिडिओ पाहताच क्षणी लक्षात येत आहे. त्यामुळे #Couple_Goals देणारी ही एव्हरग्रीन जोडीही खऱ्या अर्थाने यंदाचं वर्ष गाजवून गेली हेच खरं...

सांतारुपी ओबामा समोर येतात तेव्हा...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेहमीच त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि अनोख्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतात. अनेकांच्याच आदर्शस्थानी असणाऱ्या ओबामा यांनी यंदाच्या वर्षी लहान मुलांच्या रुग्णालयात चक्क सांताकलॉजच्या रुपात जात त्यांना धक्काच दिला. सोबतच त्यांनी सुरेख अशा भेटवस्तूही नेल्या होत्या, त्यामुळ खऱ्या अर्थाने ये हुई ना बात... असंच म्हणावं लागेल. 

उत्तर प्रदेश पोलिसांचा 'ठाय- ठाय' गोळीबार 

एका कारवाईमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेला अनोखा गोळीबार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजला. एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये पोलिस चक्क बंदुकीची काडतुसं अडकल्यामुळे तोंडानेच 'ठाय- ठाय', असा आवाज करताना दिसले. 

वडील- मुलीचं नातं असावं तर असं... 

'गर्ल्स लाइक यू' हे गाणं आपले बाबा गुणगुणत असल्याचं पाहून त्यांना साथ देत एक चिमुरडीही तिच्या परिने या गाण्याचे शब्द पकडत बाबांना या गाण्यात साध देताना दिसली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि पाहता पाहता अनेकांनीच तो शेअर करत लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवला. 

 
 
 
 

A post shared by Trina Wesson (@mydarlingmyla) on

ब्रेथलेस वीणावादनाचा नजराणा... 

गायक- संगीतकार शंकर महादेवन यांनी गायलेलं ब्रेथलेस गाणं हे गाण्याचा अनेकांनीत प्रयत्न केला. पण, शंकर महादेवन यांच्याइतक्या कौशल्याने गाणं ते प्रत्येकाला जमलच असं नाही. याच गाण्यावर आंध्र प्रदेशच्या श्रीवाणी हिने वीणा वाजवर आपल्या कलेचा अप्रतिम नजराणा सादर केला. महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनीही सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ शेअर केला होता. 

कुवेती नागरिकाने छेडले वैष्णव जन चे सूर... 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना एका कार्यक्रमात कुवेत येथील गायकाने आश्चर्याचा धक्काच दिला. कुवेतमध्ये स्वराज यांनी भेट दिली असता या गायकाने त्यांना वैष्णव जन तो...हे भजन गाऊन दाखवलं आणि अनेकांचीच मनं जिंकली.