GT vs RCB highlights, IPL 2024 : विल जॅक्सचा गुजरातला तडाखा! गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने मात

Sun, 28 Apr 2024-6:54 pm,

GT vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 45 व्या सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर, रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचे (Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru) आव्हान असणार आहे.

Gujarat Titans vs Royal Challengers Banglore Live Score in Marathi: आज अहमदाबादमध्ये गिलच्या गुजरात टायटन्ससमोर, डू प्लेसीच्या बंगळुरूचे आव्हान आहे, अशात कोणता संघ आज बाजी मारून पॉइंट्स टेबलमध्ये 2 महत्वाचे पॉइंट्स जिंकणार हे बघण्यायोग्य असणार आहे. 

Latest Updates

  • विल जॅक्सने फक्त 41 बॉलमध्ये शतक ठोकून गुजरात टायटन्सला 9 विकेट्सने पराभूक केलयं आणि पॉइंट्स टेबलमध्ये महत्वपूर्ण 2 पॉइंट्स कमवले आहेत.

  • 15 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर 177-1 असा आहे. मोहित शर्माच्या 15 व्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने तब्बल 29 धावा ठोकल्या आहेत. या स्थितीत आरसीबीला 30 बॉलमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी लागणार आहे.

  • 15 व्या ओव्हरमध्ये विल जॅक्सने फक्त 36 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. कोहली आणि जॅक्सच्या भागीदारीमुळे आरसीबीने या सामन्यात आपली मजबूत पकड बनवली आहे.

  • 10 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्कोर 98-1 असा आहे. विराट कोहलीने याच ओव्हरमध्ये आपलं अर्धशतक पण पूर्ण केलं आहे. तर विल जॅक्स हा 16 धावांवर खेळत आहे. आरसीबीला येथून जिंकण्यासाठी 60 बॉलमध्ये 103 धावांची गरज आहे.

  • 5 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्कोर 48-1 असा आहे. विराट कोहली हा 14 धावांवर खेळतोय तर त्याचे साथ विल जॅक्स हा 4 धावांवर देत आहे. आरसीबीला या स्थितीतून जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 153 धावांची गरज आहे

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा कॅप्टन फाफ डू प्लेसी हा 24 धावांवर चौथ्या ओव्हरमध्ये साई किशोरच्या गोलंदाजीवर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर विल जॅक्स हा फलंदाजीसाठी आला आहे.

  • फलंदाजीत गुजरात टायटन्सच्या 20 ओव्हरनंतर 201 धावांचे आव्हान रॉयल चॅलंजर्स बंगळुरूसमोर दिलं आहे. गुजरातकडून फलंदाजीत साई सुदर्शन याने नाबाद 84 धावांची उत्कृष्ट खेळी खेळलीये, तर  शाहरूख खान यानेसुद्ध 58 धावांची ताबडतोब खेळी खेळली आहे. तर बंगळुरूकडून गोलंदाजीत स्वप्नील सिंग, सिराज आणि मॅक्सवेल या तिघांनी प्रत्येकी, 1-1 विकेट घेतल्या आहेत.

    आता बघण्यायोग्य गोष्ट असणार की, आरसीबीचे फलंदाज या टार्गेटला चेस करणार की, गुजरातची गोलंदाजी आपला कमाल दाखवुन बंगळुरूला रोखणार?

  • 15 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 138-3 असा आहे. याच ओव्हरमध्ये साई सुदर्शन याने 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतक सुद्धा पूर्ण केलं आहे. साई सुदर्शनने आपल्या अर्धशतकीय खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

  • मोहम्मद सिराजच्या 15 व्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा सेट बॅट्समन शाहरूख खान हा 58 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर डेविड मिलर हा फलंदाजीसाठी मैदानात आलाय.

  • गुजरात टायटन्सचा धाकड फलंदाज शाहरूख खान याने 23 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. साई सुदर्शनही दुसऱ्या बाजूने 44 धावांवर खेळत आहे.

  • 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर असा 82-2 आहे. साई सुदर्शन हा 32 धावांवर खेळतोय, तर शाहरूख खान हा 23 धावांवर खेळत आहे. साई आणि शाहरूख या दोघं फलंदाजांमध्ये 62 धावांची भागीदारी झाली आहे.

  • 7 व्या ओव्हरमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या ओव्हरमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल हा 16 धावांवर आउट झाला आहे, दुसऱ्या विकेटनंतर शाहरूख खान हा फलंदाजीसाठी आला आहे. 7 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा स्कोर आहे 47-2.

  • पाच ओव्हरनंतर गुजरातचा स्कोर 35-1 असा आहे. शुभमन गिल हा 13 धावांवर खेळतोय, तर साई सुदर्शन हा पण 13 धावांवर खेळतोय. या दोघं फलंदाजांनी पहिल्या विकेटनंतर गुजरातच्या इनिंगला सावरलं आहे.

  • गुजरात टायटन्सला पहिल्याच ओव्हरमध्ये स्वप्निल सिंगच्या गोलंदाजीवर वृद्धिमान साहाच्या रूपात पहिला धक्का बसला आहे. साहा हा फक्त 5 धावांवर बाद झाला, पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आलाय.

  • GT vs RCB टॉस अपडेट - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन :

    फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.

    गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन :

    शुभमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link