दयाशंकर मिश्र : कसे आहात, एकदम ठीक, असं सर्व काही विचारत असतात, कसे आहात, याला बहुतांश उत्तर एकदम ठीक असंच उत्तर मिळतं, जसा प्रश्न, तसं उत्तर. हे बाहेरच्या जगासाठी ठीक आहे. पण अंतर्गत सर्कलही असंच झालं तर कसं चालेल. न सांगताच समजून घेण्याचा जग तसं फार जुनं नाहीय. तेव्हा डोळ्यांनी मनातली गोष्ट वाचली जायची, डोळ्यातून मन वाचण्याचं ओळखण्याचं खास कौशल्य नव्हतं, पण ही बाब आता दुर्मिळ होत चालली आहे. आता कुठे कुणी न सांगताच सर्व जाणून घेतोय. गेले ते दिवस, जेव्हा लोक लिफाफा पाहून मनातलं प्रेम ओळखत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजाला या कौशल्याचं खूप फायदे होते, एक माणूस आतल्या आत होणारी घुटमळ, नेहमी सहज ओळखत होता. प्रत्येक जण आपल्यासाठी दुसऱ्याकडे मनमोकळेपणाने बोलत होता, त्याच्या सीमेचा विस्तार तोच होत होता. स्वत:ला आपल्यात सामावून घेण्याचा संकोच, लोभ आपल्यात एवढा वाढत चालला आहे की, अनेक वेळा विश्वास ठेवणं कठीण होतं, की आपण याच ग्रहावरील माणसं आहोत का?.


आतल्या आत असं काही आहे, की आपण सरळ एकमेकांशी जोडलेलो आहोत, जे एकमेकांसाठी आहे, आपण दुसऱ्याच्या व्याख्याने जीवन जगू पाहतो, याच फेऱ्यात 'माझं-तुमचं' ही रेषा मोठी होत जाते. ही इच्छा म्हणजे पृथ्वीवरून आकाशातला चंद्र मागण्यासारखी आहे.


एक-दुसऱ्याच्या मनातली गोष्ट समजणे जरा कठीण असू शकतं, जेव्हा आपण एकमेकांपासून दूर आहोत. पण ज्यांच्या मनात आपण बसलो आहोत, असा आपण दावा करतो, ते का एवढीशी 'छोटीशी' गोष्ट समजू शकत नाहीत. अशा प्रकारे आपण एकमेकांसोबत जगत असतानाही एकमेकांना समजू शकत नाहीयत.


ती लोकं कशी त्या जमान्यात बिना 'पत्र आणि तार' शिवाय एकमेकांना समजून घेत होते. गावातील वडील कसे मनात शंका घेऊन निघत होते, की शहरात राहत असलेला मुलगा आजारी आहे, दु:खी आहे. मुलीच्या सासरी जरा अनबन आहे. याची सूचना कशी आईवडिलांना, जवळच्यांना कशी न देताही मिळत होता. आता रात्रंदिवस मोबाईल हातात असतानाही ही माहिती मिळत नाहीय.


का? का लाखो जणांचं जीवन उदास आहे, का नैराश्याकडे आणि दु:खाकडे ढकललं जात आहे. सोबत राहण्याचा उदासपणा, एकटं राहण्याच्या कष्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. असं का, हे जाणून घेणं काही रॉकेट सायन्स नाहीय. आधी मनाचे तार सहज जुळत होते. मन-व्हाया-मन! आधी आपण एकमेकांना समजण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वेळ देत होतो. वेळ देणे लहान काम नव्हतं. एकट्याने वेळ दिल्यानंतर नात्यातील जाळं साफ होत होतं. तेव्हा नात्यावर जर धुळ साचली तर अशा दिलेल्या वेळाने ही धूळ साफ होत होती, पण आता हे कुठेय.


आता सर्व प्रकरणं फोन, फेसबुक आणि सोशल मीडियावर सोडवली जात आहे. नाते तंत्रज्ञानाचा दबाव नाही सांभाळू शकत आहेत. आम्ही त्या वस्तू, त्या नात्यांना महत्व देत आहोत, जे सहाय्यक आहेत, पण जीवनाचे आधार नाहीत. आम्ही त्या नात्यांपासून तोंड वळवतोय, जे वेळ कमी असल्याचं कारण सांगत आहेत. पण ज्याच्या असण्यानेच आपलं अस्तित्व आहे.


काही दिवस तंत्रज्ञानापासून दूर मनाच्या जवळ जा. दुसऱ्यांना आपल्या मनापासून ओळख करण्याची जागा, लाईकच्या चिंतेच्या जागी असलेल्या दुबळेपणापेक्षा, त्या जागी आपला वेळ द्या, जेथे स्नेह, प्रेम आहे. जो जीवनाला प्रत्येक संकटापासून वाचवू शकतो.


आपण ताऱ्यांच्या किंमतीवर चंद्र आणि सूर्याच्या जागी उन मागत आहोत. या वाढत्या मागण्यांनी मनाला मनापासून दूर केलं आहे. आपण जेव्हा स्वत:पासून दूर झालो, ज्यांच्यासोबत राहण्याची आपण शपथ घेतो, ज्यांच्या नावावर दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस केलं जात आहे.



(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)


(https://twitter.com/dayashankarmi)


(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)