नववर्षाच्या स्वागतासाठी किंग खान अलिबागला रवाना; कॅमेरा दिसताच हुडीने लपवला चेहरा

सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो हुडीने आपला चेहरा लपवताना दिसत आहे. 

| Dec 29, 2024, 18:40 PM IST
1/7

शाहरुख खान

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच कुटुंबासह सुट्टीवर जातानाचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

2/7

अलिबागला रवाना

नुकताच शाहरुख खान मुंबईहून कुटुंबासह अलिबागला रवाना झाला आहे. जिथे तो कुटुंबासह नवीन वर्ष साजरे करणार आहे.

3/7

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील फोटो व्हायरल झाले आहेत. 

4/7

गेटवे ऑफ इंडिया

अभिनेता आज म्हणजेच रविवारी ( 29 डिसेंबर) रोजी त्याच्या कुटुंबासह गेटवे ऑफ इंडियावर दिसला. मुंबईहून तो अलिबागला रवाना झाला आहे. 

5/7

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन

अलिबागमध्ये शाहरुख खान त्याच्या कुटुंबासह नवीन वर्षाचे भव्य सेलिब्रेशन करणार आहे. या फोटोमध्ये गौरी खानने पिवळा ब्लेझर घातला होता. 

6/7

हुडीने लपवला चेहरा

तर शाहरुख खान हा काळ्या ड्रेसमध्ये दिसला. यावेळी त्याने कॅमेरा पाहून आपला चेहरा हुडीने लपवला. 

7/7

सुहाना खान

यावेळी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील सिंपल लुकमध्ये दिसली. तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉपसह लूज जीन्स परिधान केली होती.