अमित गडगे झी 24 तास : प्रतिसर्पविष म्हणजे काय हे आपण पाहीलं. आता ते रुग्णाला कसं देतात हे पाहुया..जर एखाद्याला विषारी साप चावलाच तरी तो वाचू शकतो पण त्यासाठी त्याला योग्य वेळी( सर्पदंशानतर तात्काळ किंवा 2 ते 3 तासात) प्रतिसर्पविष मिळायला हवं. पण साप चावलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यावर लगेचच प्रतिसर्पविष दिलं जात नाही. ते विशिष्ट पद्धतीनंच द्यवं लागतं.


प्रतिसर्पविष रुग्णाला कसं देतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिसर्पविष देताना खूप काळजी घ्यावी लागते. प्रतिसर्पविष देताना प्रथम रुग्णाला कोणता साप चावला हे जाणून घेतात. लक्षणावरुन ते लगेच कळतं. विषारी साप चावल्याची खात्री झाली की सुरु होतो इलाज. आणि त्याची पहिली पायरी असते अॅलर्जी टेस्ट. प्रतिसर्पविष हे घोडा किंवा मेंढ्यांपासून तयार होतं. ते नेहमी शिरेतूनच द्यावं लागतं. त्यामुळे रुग्णाला देण्यापूर्वी त्याची अँलर्जी टेस्ट घ्यावी लागते.


अॅलर्जी टेस्ट करताना रुग्णाच्या आंतरत्वचेत प्रतिसर्पविष 0.1 मिली या प्रमाणात टोचलं जातं. जर रुग्णाला त्याचा काही त्रास न झाल्यास त्याला प्रतिसर्पवीष दिलं जातं. जर त्रास झाला तर अॅलर्जी कमी करण्याच्या औषधासोबत प्रतिसर्पविष दिलं जातं. ( त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास कसली अँलर्जी असल्यास त्याची डॉक्टरांना पूर्वकल्पना द्यावी. शिवाय रुग्णाला कोणता आजार असल्यास (मधुमेह, रक्तदाब किंवा इतर कोणताही) ते ही सांगावं. कोणती औषध सुरु आहेत का याची कल्पना द्यावी, रुग्ण महिला असल्यास ती गर्भवती आहे का, तसेच मासीकपाळी बाबत माहिती द्यावी. त्यामुळे उपचारास मदत होते. )


रुग्णाची अॅलर्जी टेस्ट झाल्यानंतर त्याच्या लक्षणानुसार त्याला ठराविक वेळेत ठराविक प्रमाणात प्रतिसर्पविष दिलं जातं. या प्रमाणाला इंग्रजीत vial म्हणतात. विषाचा प्रभाव अल्प असल्यास त्याला 5 vial (50 मि.ली.) इतकं प्रतिसर्पविष पुरेसं असतं.


सर्पविष : विषारी साप चावला तरी तुम्ही जगू शकता


जर विषाचा प्रभाव मध्यम असल्यास 5 ते 10 vials (100 मि.ली.) देतात आणि गंभीर प्रभाव असल्यास 10 ते 20 vials (100 ते 200 मि.ली.) प्रतिसर्पविष दिल जातं. क्वचित प्रसंगी 30 vialsही द्याव्या लागतात. हे सगळं प्रमाण तज्ञ डॉक्टर्स रुग्णाचं वय, वजन आणि सर्पदंशाच्या लक्षणावरुन ठरवतात. लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिसर्पविष रुग्णाला तोडावाटे दिलं जात नाही. ते सलाईनद्वारे विशिष्ट प्रमाणात विशिष्ट वेळेत दिलं जातं. निष्णात डॉक्टरच ते देतात.


प्रतिसर्पविष देताना रुग्ण पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतो. त्याला केव्हाही लाईफ सपोर्ट सिस्टीमची गरज भासू शकते त्यामुळे डॉक्टरांच्या परवानगीशिवाय रुग्णास इतरत्र हलवू नये. किंवा त्यावर अन्य कोणतेही बाह्योपचार करु नये..


ब्लॉग : सर्पदंश झाल्यानंतरही माणूस का मरत नाही?


आता आपल्याला चावलेला साप विषारी आहे हे कसं ओळखायचं हे जाणून घेऊया पुढील भागात...