Coronavirus मुळे सचिन तेंडुलकरने गमावला आणखी एक जवळचा मित्र
विजय फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये सहभागी झाले होते.
मुंबई : टीम इंडीयाचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कोरोना वायरसमुळे (Coronavirus)आपला आणखी एक मित्र गमावलाय. माजी क्रिकेटर विजय शिर्के (Vijay Shirke) यांचे ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात निधन झाले. १९८० च्या दशकात सनग्रेस मफतलाल(Sun Grace Mafatlal)टीमसाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)आणि विजय शिर्के एकत्र खेळायचे. विजय फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये सहभागी झाले होते.
सचिनचा जुना मित्र सलिल अंकोला (Salil Ankola)ने आपल्या फेसबुक पेजवरुन विजय शिर्केंना श्रद्धांजली दिली. तुम्ही लवकर निरोप दिलात. तुमच्या आत्म्यास शांती मिळो. मैदान आणि मैदानाबाहेर आपण जो वेळ व्यतित केला तो विसरु शकत नाही. असे त्याने पोस्टमध्ये म्हटले.
कोरोनाचा शिकार
काही दिवसांपुर्वी विजय शिर्के यांना कोरोनाची लक्षण दिसली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात देाखल करण्यात आलं होतं. त्यांनी यावर मात केली होती. पण कोरोनाच्या साईड इफेक्टमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आणखी एक मित्राचा मृत्यू
सचिन तेंडुलकरने कोरोना वायरसमुळे याआधी एक मित्र गमावलाय. अवि कदम यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये अविने जगाचा निरोप घेतला होता.