Ind vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?
Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?
Ind vs pak t20 world cup 2022 : येत्या रविवारी म्हणजेच 23 ऑक्टोबरला भारत विरूध्द पाकिस्तान (IND vs PAK) सामना रंगणार आहे. त्यातही भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात नेमकं काय घडणार याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.
बुधवारी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले की, तो या सामन्यासाठी सज्ज आहे. परंतु यादरम्यान सोशल मीडियावर (social media) एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Photo Viral) होत आहे. हे पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट चाहते रोहित शर्माला विचारत आहेत की, तो पाकिस्तान (pakistan Team) क्रिकेट संघात सामील झाला आहे का? नेमकं हे प्रकरण काय आहे याबद्दल जाणून घेऊया...
इब्राहिम बादीस रोहित शर्मासारखा दिसतो
खरतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे व्यवस्थापक इब्राहिम बादीस (Ibrahim Badis) यांनी ट्विटरवर सर्वप्रथम ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन (Brisbane, Australia) येथील गाब्बा क्रिकेट ग्राऊंडवरून (Gabba Cricket Ground) त्यांची छायाचित्रे पोस्ट केली.
इब्राहिम रोहित शर्मासारखा लूक देत होता. जेव्हा तो हिटमॅनसारखा (Hitman rohit sharma) दिसला तेव्हा तो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) झाला. नेटिझन्सनी रोहित शर्माला टॅग करत तू पाकिस्तान संघात कधी सामील झालास, अशी विचारणा केली आहे.
पाकिस्तानच्या किटमध्ये रोहित शर्मा
ट्विटरवर एका युजर्सने लिहिले: "रोहित शर्मा हा तू आहेस?" दुसर्याने ट्विट केले, "मला वाटले की तो पाकिस्तानच्या किटमध्ये रोहित शर्मा आहे." आणखी एका यूजरने ट्विट केले की, "शाहीन शाह आफ्रिदीच्या शानदार पुनरागमनानंतर रोहित शर्माने पाकिस्तान संघात सामील होण्याचा निर्णय घेतला."
वाचा : चाहत्यांनो तयार व्हा ! IND vs PAK सामना होणार आणखी थरारक, पाहा होणार तरी काय
रोहित काय म्हणाला?
“खेळाडूंनी सामन्यादरम्यान स्वत:ला शांत आणि संयमी ठेवता आले तर आम्हाला हवे तसे निकाल मिळतील. वर्ल्ड कप जिंकून बरेच दिवस झाले आहेत", असं रोहित म्हणाला. तसेच त्याने पाकिस्तान विरुद्धचा प्लॅनही सांगिततलाय. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला भिडणार आहे. “सुरुवातीला ही एक मोठी मॅच आहे. पण आम्ही ‘रिलॅक्स’ राहू आणि खेळाडू म्हणून काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करू. हे आमच्यासाठी महत्त्वाचे असेल", असंही रोहितने नमूद केलं.