IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 फलंदाजांवर सर्वांची नजर, कोणाच्या जीवावर जिंकणार सामना

IND vs PAK T20 WC 2022 : 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी येथे खेळवला जाईल. 

Updated: Oct 20, 2022, 09:56 AM IST
IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 फलंदाजांवर सर्वांची नजर, कोणाच्या जीवावर जिंकणार सामना  title=

IND vs PAK T20 WC 2022 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषकातील बहुप्रतिक्षित सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी (MCG) येथे खेळवला जाईल. ग्रुप 2 च्या या सामन्याची केवळ भारत आणि पाकिस्तानच (IND vs PAK) नाही तर संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. कोणी स्टेडियममध्ये, कोणी टीव्हीवर, रेडिओवर तर कोणी ऑनलाइन बघतील. (india vs pakistan t20 world cup 2022 on 23 oct rohit sharma)

यावेळी दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडूंची फौज असली तरी काही महत्त्वाच्या खेळाडूंवर खासकरुन फलंदाजांवर क्रिकेट चाहत्यांची नजर असेल. यामध्ये जर फलंदजांचा विचार केला तर पुढील पाच खेळाडू उत्तम कामगिरी करु शकतात... 

रोहित शर्मा (Rohit Sharma) 

भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पाकिस्तानविरुद्ध आपल्या बॅटने विरोधी संघाच्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवू शकतो. जगातील एक धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे रोहितकडे पहिल्यांदाच विश्वचषकात (T20 WC 2022) भारतीय क्रिकेट संघाची कमान सोपवण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये तो फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी करू शकला नाही, पण पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात चाहत्यांची प्रतीक्षा संपेल अशी आशा आहे. रोहितने त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 142 सामने खेळले आहेत आणि 4 शतके आणि 28 अर्धशतकांसह 3737 धावा केल्या आहेत.

बाबर आझम (Babar Azam)

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) दहशत सर्वांनाच माहित आहे. अशा स्थितीत तो भारतीय गोलंदाजांचे लक्ष्य असेल. पाकिस्तानसाठी एकट्याने अनेक सामने जिंकणाऱ्या बाबर आझम पुन्हा एकदा चांगल्या फॉर्मात परतू शकतो. त्यामुळे बाबर भारतीय संघाविरुद्ध त्याच्या जुन्या लयीत फलंदाजी करण्याची दाट शक्यता आहे. आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन शतके आणि 29 अर्धशतकांच्या मदतीने 3231 धावा केल्या आहेत.

विराट कोहली (virat kohli) 

विराट कोहली (virat kohli) पुन्हा एकदा शानदार फॉर्ममध्ये येऊ लागला आहे. कोहलीने आशिया चषकात शतक झळकावून त्याची ओळख दाखवली. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या मोठ्या मंचावर तो आपल्या बॅटची धार दाखवण्यासाठी आतुर असेल. विराटने आतापर्यंत 109 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये एक शतक आणि 33 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 3712 धावा केल्या आहेत.

वाचा : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की कमी झाले? जाणून घ्या आजची नवी किंमत

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan)

पाकिस्तानचा विकेट कीपर (Wicket keeper) फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. त्याआधी त्याने आशिया कपमध्ये बॅट खेळली होती आणि आता टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या मंचावर चाहत्यांना त्याच्याकडून खूप आशा आहेत. 30 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 52.34 च्या सरासरीने एक शतक, 22 अर्धशतकांसह एकूण 2460 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 

मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) भारतासाठी आतापर्यंत फक्त 34 टी-20 सामने खेळले असतील पण एकूणच त्याला या फॉरमॅटमध्ये खूप अनुभव आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी एक शतक आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. आता पाकिस्तानविरुद्धही त्याच्याकडून खूप आशा असतील. सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यातही अर्धशतक झळकावले होते.