मुंबई : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सकडून सणासुदीच्या काळात बंपर ऑफर्स देण्यात येतात. त्याचप्रमाणे अॅमेझॉनही विविध ऑफर्स घेऊन येत आहे. मोठ्याप्रणात आयोजित करण्यात येणाऱ्या सेलचा अंदाज पाहता अॅमेझॉनने भारतात २२ हजार हंगामी जागा निर्माण केल्या आहेत.


या नोकऱ्या देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये फुलफिल सेंटर, सॉर्टेशन सेंटर, डिलीव्हरी स्टेशन आणि कस्टमर सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाणार आहेत.


या शहरांत उपलब्ध होणार नोकऱ्या


मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु, अहमदाबाद आणि देशभरातील इतरही शहरांत नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, या नोकऱ्या हंगामी स्वरूपात असणार आहेत.


अॅमेझॉनचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना यांनी सांगितले की, एक चांगली ऑनलाइन वेबसाईटच्या रुपात आपली चांगली जागा बनवून ठेवण्यासाठी कंपनी आपल्या टीमला वाढवत आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्रास होणार नाही आणि प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत आम्ही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहोत.