मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर झाली. यंदा निकाल नव्वदी पार गेल्याने पहील्या प्रवेश यादीचे कट ऑफही वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवेश घेताना पालक आणि विद्यार्थ्यांची कसरत होणार आहे. आर्टस्  सायन्स कॉमर्स एमसीव्हीसी या सर्व शाखांचा विचार करता एकूण दोन लाख  तीन हजार एकशे वीस विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले होते. त्यात एक लाख २ हजार पाचशे अडूसष्ठ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकरावी प्रवेशा संबंधित माहीती संकेत स्थळावर जाहीर mumbai.11thadmission.net  करण्यात आली आहे. त्यानंतर ६ ते ९ जुलै ह्या दिवसांत महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. जर विद्यार्थाने भरलेल्या पसंतीत यादीतील पहील्या पसंतीचे कॉलेज ज्या विद्यार्थाना मिळेल त्यांना प्रवेश निश्चित करणे गरजेचे असेल .


पहिल्या यादीतील प्रवेश – ६ ते ९ जुलै(सकाळी ११ ते सायं. ५)
रिक्त जागांचा तपशील – १० जुलै, सकाळी ११
पसंतीक्रम भरणे – १० ते ११ जुलै (सकाळी ११ ते सायं. ५)
दुसरी गुणवत्ता यादी – १३ जुलै, दुपारी ४ वा.
तिसरी गुणवत्ता यादी – २३ जुलै, सकाळी ११ वा.
तिसऱया यादीतील प्रवेश – २४ व २५ जुलै
चौथी गुणवत्ता यादी – २९ जुलै, सकाळी ११
चौथ्या यादीनुसार प्रवेश – ३०, ३१ जुलै (सकाळी ११ ते सांय. ५)