JEE Advanced Result: असा पाहा जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल
आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून १,५५,१५८ बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
मुंबई: आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज (रविवार, १० जून) जाहीर झाला. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या माहितीतल्या विद्यार्थ्याने ही परीक्षा दिली असेल आणि त्याचा निकाल तुम्हाला पहायचा असेल तर, तुम्ही तो तत्काळ पाहू शकता. त्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा.
कसा पाहाल जेईई अडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल?
सर्व प्रथम इंटरनेटवर jeeadv.ac.in किंवा results.jeeadv.ac.in या संकेतस्थळांना भेट द्या.
वरील संकेतस्थळ सुरू झाल्यावर योग्य त्या ठिकाणी नोंदणी नंबर, जन्म तारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आदी माहिती बिनचूक भरा.
ही माहिती भरल्यावर तुम्हाला तुमचा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल. हा निकाल तुम्ही डाऊनलोडही करू शकता. किंवा स्क्रिन शॉट काढून सेवही करू शकता.
दरम्यान, कधी कधी सर्व्हरला प्रॉब्लम असल्यामुळे किंवा इंटरनेटचे स्पीड कमी असल्यामुळे संकेतस्थळ उघडायला वेळ लागू शकतो. पण, त्यामुळे निराश होण्याची आवश्यकता नाही. काही काळ थांबा व थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
देशभरातील विद्यार्थ्यंनी दिली होती परीक्षा
आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून १,५५,१५८ बसले होते. त्यापैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, या परीक्षेत ३६० पैकी ३३७ गुण मिळवत हरयाणातील पंचकुला येथील प्रणव गोयल देशभरातून पहिला आला. तर, ऋषी अग्रवाल हा राज्यातून पहिला आला आहे. दरम्यान, साहिल जैन, कलश शहा हे विद्यार्थ्यी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख हिने ३६० पैकी ३१८ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकूण निकालात ती देशातून सहावी आहे. या परीक्षेत एकूण १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. तर, सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले