बारावी पास असणाऱ्यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ज्यूनिअर ऑपरेटरच्या ५० वर रिक्त जागा आहेत.
मुंबई : १२ वी पास असणाऱ्यांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकर भरती सुरू आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) ज्यूनिअर ऑपरेटरच्या ५० वर रिक्त जागा आहेत. इच्छुक उमेदवार ७ जुलैपूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारासाठी अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदांविषयीची माहिती समजून घ्या.
पदाचे नाव - ज्यूनिअर ऑपरेटर
पोस्ट संख्या - एकूण ५० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून १२ वी आणि आयटीआय कोर्स.
वयोमर्यादा- किमान वय १८ वर्षे असणे आणि कमाल वय २६ वर्षे
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड लेखी परीक्षणावर आधारित
अंतिम तारीख - 7 जुलै 2018
पगार - १०,५०० ते २४,५००
अर्ज शुल्क- सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये तर एसटी / एससी उमेदवारांची फी नाही.
अर्ज कसा करावा - इच्छुक उमेदवार www.iocl.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.