Akshay Kumar vs Vikrant Massey :  '12 वी फेल' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून कोणालाही काहीही होप्स नव्हते. अशात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ते ही फक्त भारतात नाही तर परदेशातही प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं परदेशात 40 कोटी पेक्षा जास्त कमाई केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट सगळ्यात कमी बजेटमध्ये बनला आहे. त्यामुळे चित्रपटानं केलेला गल्ला हा नक्कीच आश्चर्य कारक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटात विक्रांत मैसी आणि मेधा शंकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या तीन आठवड्यात 35.65 कोटींची कमाई केली. चित्रपटाची मजेशीर पटकथा आणि ज्या प्रकारे चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे त्यानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हा चित्रपट लॉकडाऊननंतर झालेला पहिला नॉन-स्टारर कास्ट चित्रपट आहे. हा चित्रपट सगळ्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटाला मागे टाकत पुढे घेऊन जात आहे. त्याची ग्लोबल अपील ही वर्ल्डवाईड ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शननं स्पष्ट होतंय. 



गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या मिशन रानीगंज या चित्रपटाला देखील कमाईच्या बाबतीत '12 वी फेल' नं मागे टाकलं आहे. या चित्रपटानं 30 ते 35 कोटींची कमाई केली आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार अक्षय कुमारनं 'मिशन रानीगंज' या चित्रपटासाठी 100 पेक्षा जास्त मानधन घेतलं होतं. याशिवाय '12 वी फेल' या चित्रपटानं कंगना रणौतच्या तेजस, टायगर श्रॉफच्या गणपत, थलपती विजयच्या लिओ आणि टायगर नागेश्वर राव या चित्रपटाला देखील मागे टाकलं आहे. 


हेही वाचा : गाण्याच्या शुटिंगसाठी शाहरुख खान 2 दिवस पाणीच प्यायला नाही, पाण्याच्या एका घोटानेही झाली असती गडबड


'द मार्वल्स'ला देखील टाकलं मागे!


'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच 'द मार्वल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट देखील सिनेमाघरात चांगली कामगिरी करत नाही. या चित्रपटानं 2.5 कोटी कमवत ओपनिंग केली. गुरुवारी या चित्रपटानं फक्त 91 लाख रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानं सात दिवसात 12.06 कोटींची कमाई केली. निया डाकोस्टा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ब्री लार्सन, टेयोना पॅरिस, इमान वेल्लानी,सॅम्युअल एल जॅक्सन आणि जाव एस्टन सारखे अनेक कलाकार आहेत.