महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांना टक्कर देते कोकणातील एक छोटसं गाव; छुपं हिल स्टेशन

कोकणातील हे गाव थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक इथं गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी येतात. 

| Dec 17, 2024, 21:18 PM IST

Amboli sawantwadi hill stations maharashtra : महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, खंडाळा ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आणि थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील ही हिल स्टेशन्स फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. कोकणातील एक छोटसं गाव महाराष्ट्रातील या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांना  टक्कर देते. जाणून घेऊया हे गाव कोणते?

 

1/7

कोकण म्हणजे स्वर्ग...  एका शब्दात कोकणच्या सौंदर्याचे वर्णन केले जाते. अथांग समुद्र किनारा लाभलेल्या कोकणात एक छोटस गाव आहे जे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखळे जाते. 

2/7

खास गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक कोकणातील या गावाला आवर्जून भेट देतात. 

3/7

आंबोली हे धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. यासह जंगल, डोंगरदऱ्या, अप्रतिम निसर्ग सौंदर्य येथे पहायला मिळते. 

4/7

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावात पडतो.  म्हणूनच आंबोली हे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणूनही ओळखले जाते. 

5/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीपासून 30 किमी अंतरावर आंबोली आहे. आंबोली घाट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.  

6/7

आंबोली गाव हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण आहे. कोकणात सर्वात जास्त थंडी आंबोलीतच पहायला मिळते.  

7/7

 कोकणातील छुपं हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणाऱ्या या गावाचे नाव आहे आंबोली.