मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी अभिनेत्री रिया विरूद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि गंभीर आरोप केले आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की, मुंबई पोलिसांच्या तपासावर त्याचा विश्वास नाही. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतला हे क्षेत्र सोडून केरळमध्ये जाऊन तेथे सेंद्रिय शेती करायची होती. रियाने सुशांतला सतत रोखले. ती त्याच्यासोबत दुसरीकडे शिफ्ट होणार नाही असं तिने म्हटले.


सुशांतच्या वडिलांनी तक्रार दिली आहे की, जेव्हा सुशांत यावर सहमत झाला नाही तर ती सर्व दागिने, पैसे, क्रेडिट कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि वैद्यकीय रिपोर्ट घेऊन घरातून निघून गेली. तिने सुशांतचा नंबर ही ब्लॉक केला होता.


सुशांतने आपल्या बहिणीला सांगितले होते की, ती सर्व कागदपत्रे सोबत घेऊन गेली असून ते मीडियासमोर लीक करण्याची धमकी देत आहे. तू वेडा असल्याचं सगळ्यांना सांगेल आणि त्यामुळे तुला कोणीची काम देणार नाही.' असं देखील ती सुशांतला धमकी देत होती.


2019 मध्ये रियाची भेट होण्यापूर्वी सुशांत पूर्णपणे सामान्य होता. मग असं काय झालं की, रियाला भेटल्यानंतर काही महिन्यांतच तो मानसिक रुग्ण बनला? सुशांत मानसिक रुग्ण होण्याचे कारण काय होते याची चौकशी झाली पाहिजे.


रिया सुशांतला तिच्या घरी घेऊन गेली आणि उपचारादरम्यान त्याला बर्‍याचदा ओव्हरडोज देण्यात आला. रियाने सर्वांना सांगितले की सुशांतला डेंग्यू आहे.


रिया सुशांतला कोणताही चित्रपट साइन करण्यास परवानगी देत ​​नव्हती. जेव्हा जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा सुशांतला अट घातली गेली की, ज्यामध्ये रिया ही मुख्य अभिनेत्री असेल त्याने तोच चित्रपट करावा.


डिसेंबर 2019 मध्ये रियाने सुशांतचा नंबर जबरदस्तीने बदलला. ज्यामुळे तो आपल्या कुटूंबियांशी आणि ज्यांच्याशी तो खूप जवळ होता त्या लोकांशी बोलू शकत नव्हता. रियाने सुशांतला पटना येथे कुटुंबाकडे येण्यास देखील बंद केलं होतं.


2019 मध्ये सुशांतच्या खात्यात 17 कोटी रुपये होते, परंतु पुढच्या काही महिन्यांत त्याच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले. ही रक्कम अशा खात्यांना पाठविली गेली होती. ज्याचा सुशांतशी काही संबंध नव्हता. रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या खात्यात किती पैसे आले आणि कोठून आले याची चौकशी झाली पाहिजे.