बॉक्स ऑफिसवर `मिशन मंगल`ची बंपर ओपनिंग
कमाईचे आकडे पोहचले...
मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मिशन मंगल' 15 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 'मिशन मंगल'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झालेल्या 'मिशन मंगल'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली असून चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 29.16 कोटींचा गल्ला जमवला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडे जाहीर केले आहेत. पहिल्याच दिवशी 29.16 कोटींचा गल्ला जमवणारा 'मिशन मंगल' अक्षय कुमारच्या करियरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 'मिशन मंगल' दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सलमानचा 'भारत' चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे.
वर्षातील सर्वाधिक ओपनिंग चित्रपट
भारत - 42.30 कोटी
कलंक - 21.60 कोटी
केसरी - 21.06 कोटी
गली बॉय - 19. 40 कोटी
टोटल धमाल - 16.50 कोटी
अक्षय कुमारचे सर्वाधिक ओपनिंग चित्रपट
2016 - रुस्तम 14.11 कोटी
2017 - टॉयलेट एक प्रेमकथा 13.10 कोटी
2018 - गोल्ड 25.25
2019 - मिशन मंगल 29.16 कोटी
मिशन मंगल चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलंय. अक्षय कुमारसह चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, शर्मन जोशी, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी, नित्या मेनन, संजय कपूर आणि जीशान अयूब यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
चित्रपटात अक्षय संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत आहे. इतिहासच्या पानांत सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या देशाचा प्रेरणादायी अंतराळ प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.