Jeete Hain Shaan Se: बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता आपल्या आवडत्या अभिनेत्याला पड्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असायचे. अभिनेत्याच्या चित्रपटाची तिकिटे घेण्यासाठी थिएटर बाहेर प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागायच्या. आज आम्ही अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो 14 दिवस बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल राहिला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाचे नाव आहे 'जीते हैं शान से'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 सुपरस्टार एकत्र


1988 मध्ये प्रदर्शित झालेला 'जीते हैं शान से' या चित्रपटामध्ये अभिनेता गोविंदा, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त यासारखे सुपरस्टार अभिनेते होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी या चित्रपटाची तिकिटे खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 'जीते हैं शान से' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. या चित्रपटाने 14 दिवस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 


'जीते हैं शान से' या चित्रपटाचे बजेट 2 कोटी होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8 कोटी रुपयांची कमाई केली होती. कवल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कवल शर्माच्या कारकिर्दीतील हा सर्वात हिट चित्रपट होता. त्याचबरोबर मिथुन चक्रवर्तीचा देखील हा 1988 मधील सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटात मंदाकिनी ज्युलीच्या भूमिकेत होती. तर विजयता पंडित किरणच्या भूमिकेत होती. डॅनी डेन्झोंग्पा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होते. 


'जीते हैं शान से' हा चित्रपट मोफत पाहू शकता


मिथुन चक्रवर्ती आणि गोविंदा यांची या चित्रपटात एकत्र काम करण्याची पहिली आणि शेवटची वेळ होती. 'जीते हैं शान से' चित्रपटात गोविंदा इक्बाल अलीच्या भूमिकेत होता. तर संजय दत्त गोविंदाच्या भूमिकेत होता. मिथुन चक्रवर्ती जॉनीच्या भूमिकेत होता. जर तुम्हाला देखील हा चित्रपट मोफत बघायचा असेल तर तो YouTube वर उपल्बध आहे. 


सध्या गोविंदा इंडस्ट्रीपासून दूर राहिला आहे. त्याने शेवटचा चित्रपट 2019 मध्ये 'रंगीला राजा' केला होता. मिथुन चक्रवर्ती हा 'प्रोजापोटी', 'काबुलीवाला', 'द कश्मीर फाइल्स'  आणि 'शास्त्री'मध्ये दिसला होता. तर अभिनेता संजय दत्त हा शेवटचा 'जवान' या चित्रपटात कॅमिओ करताना दिसला होता.