कुठे पाहता येणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा?
आयुष्मान खुराना, विकी कौशलला मिळणार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
नवी दिल्ली : #NationalFilmAwards #66thNationalFilmAwards ऑगस्ट महिन्यात ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये आयुष्मान खुराना, विकी कौशल या दोन आघाडीच्या कलाकारांच्या वाट्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. अनुक्रमे 'अंधाधुन' आणि 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटांसाठी त्यांना या पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.
२३ डिसेंबर म्हणजेच सोमवारी हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी राष्ट्रपती नव्हे, तर उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. PTI या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार राष्ट्रपती, पुरस्कार वितरणानंतर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतील असं सांगण्यात आलं आहे. या पुसस्कार सोहळ्याचं थेट प्रक्षेपण हे पीआयबी इंडियाच्या युट्यूब वाहिनीवर आणि फेसबुक पेजवरुनही लाईव्ह करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला बिग बींची अनुपस्थिती
बिग बी अमिताभ बच्चन यांना या पुरस्कार सोहल्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होतं. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या सोहळ्यास अनुपस्थित असणार आहेत. दरम्यान, या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने एक नजर टाकूया विजेत्यांच्या यादीवर....
* सर्वोत्कृष्ट लघुपट- खरवस
* सर्वोत्कृष्ट चित्रपट- हेलारो (गुजराती)
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधून
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)
* सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
* सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट- पद्मन
* सर्वोत्कृष्ट चित्रपट (पर्यावरण संवर्धन)- पाणी
* सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्मान खुराना (अंधाधून), विकी कौशल (उरी)
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- किर्थी सुरेश (महंती)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
* सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे, पी.व्ही. रोहित, साहिब सिंग, तल्हा अर्शद रेशी
* सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शन) - सुधाकर रेड्डी यंकट्टी (नाळ)
* सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित)- अंदाधून
* सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) - ची ला सो
* सर्वोत्कृष्ट संवाद- तारीख (बंगाली)
* सर्वोत्कृष्ट रंगभूषा- आव (तेलुगू)
* सर्वोत्कृष्ट संगीतकार- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
* सर्वोत्कृष्ट गीतकार- नतिचरामी (कानडी)
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस- आव (तेलुगू) केजीएफ (कानडी)
* सर्वोत्कृष्ट साहसी दृश्य- केजीएफ
* सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग- उरी
* सर्वोत्कृष्ट संकलन- नतिचरामी (कानडी)
* सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनिंग- कामरा संभवम (मल्याळम)
* सर्वोत्कृष्ट वेशभुषा- महंती (तेलुगू)
* सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (बिंते दिल)