...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला बिग बींची अनुपस्थिती

याबाबत माहिती देत ते म्हणाले... 

Updated: Dec 23, 2019, 07:05 AM IST
...म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला बिग बींची अनुपस्थिती title=
अमिताभ बच्चन

मुंबई : हिंदी कलाविश्वात महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बी Amitabh Bachchan अमिताभ बच्चन यांनी आपण National Film Awards ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचा अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. दिल्लीत सोमवारी पार पडणाऱ्या या सोहळ्याला प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत बिग बींची अनुपस्थिती असेल. 

'शरीरात ज्वर असल्यामुळे मला प्रवास करण्याची परवानगी नाही. त्यामुळे दुर्दैवाने दिल्लीत पार पडणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो', असं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं. 

पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांना उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. सहसा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा हा राष्ट्रपतींच्या हस्ते होतो. पण, सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून विजेत्यांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन कालांतराने करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या वेळी अनेक मान्यवरांसह माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचीही उपस्थिती असेल. 

वाचा : बिग बींची नात म्हणतेय, 'आम्ही अशा जगात जागे होऊ, जिथे माझा आवाज दाबला जाणार नाही' 

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच बिग बींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ७७ वर्षीय अभिनेत्याने पुन्हा एकदा आगामी चित्रपटांच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यातस सुरुवात केली होती. हल्लीच त्यांनी स्लोव्हाकिया येथे 'चेहरे' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. कामाच्या या व्यापातूनच वेळ काढत नुकत्याच पार पडलेल्या इफ्फी चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यालाही त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.