नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या शास्त्री भवन ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर, मराठीसह बहुविध भाषांमधील चित्रपटांनाही विविध क्षेत्रांमधील पुरस्कार जाहीर करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे पार पड़णाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींची उरपस्थिती पाहायला मिळत आहे. २०१८ या वर्षातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्वच चित्रपटांचा गौरव या पुरस्कार सोहळ्यात केला जाणार आहे. देशाचे उपराष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांचा गौरव करतील. यंदाच्या वर्षी या सोहळ्यात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार हा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावे घोषित करण्यात आला. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. 


*चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून विकी कौशल (उरी- द सर्जिकल स्ट्राईक) आणि आयुष्मान खुराना (अंधाधुन) यांना गौरवण्यात आलं. 




*सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी संजय लीला भन्साळी यांना सन्मानित करण्यात आलं. चित्रपट, होता 'पद्मावत'




*श्रीनिवाससह यावेळी इतर तीन बालकलाकारांचाही गौरव करण्यात आला. 


*'नाळ' या चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 



*स्पेशल ज्युरी अवॉर्डने 'हेल्लारो' चित्रपटातील १३ अभिनेत्रींना रजत कमळ देऊन गौवण्यात आलं. 



*सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी कृती महेश माद्या आणि ज्योती तोमर यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांनी 'पद्मावत' या चित्रपटातील 'घूमर' या गीतावर नृत्यदिग्दर्शन  केलं होतं. 



*सर्वोत्कृष्ट साहसदृश्य दिग्दर्शनासाठी विक्रम मोरे यांना सन्मानित करण्यात आलं. चित्रपट 'केजीएफ' 




*'अंधाधुन'चा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून गौरव 


*उपराष्ट्रपतींच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. 


*चित्रपटांच्या दृष्टीने पूरक वातावरण आणि चित्रीकरणाच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्मितीसाठीचा पुरस्कार उत्तराखंड या राज्याला देण्यात आला. 



*सागर पुराणिक यांना 'महान हुतात्मा'साठी विशेष उल्लेख पुरस्कार 



*सूत्रसंचालनाची जबाबदारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्यावर