नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?

दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या. 

May 21, 2024, 13:47 PM IST

10th 12th Failed Indian Celebrity: दहावी, बारावी परीक्षा हा करिअरचा सुरुवातीचा टप्पा आहे. यात कमी यश मिळालं अथवा नाही मिळालं तरी निराश होऊ नका. आहे तो निकाल मान्य करा आणि पुन्हा जोमाने तयारीला लागा. तुमच्या आवडत्या क्षेत्राचे शिक्षण घ्या. 

1/9

नापास झाल्याने टेन्शन आलंय? तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा 10वी, 12वीचा निकाल माहितीय का?

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

10th 12th Indian Celebrity: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल लागलाय. सालाबादप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली. उत्तीर्ण झालेली मुले करिअरच्या नव्या वाटा शोधतील पण अनुत्तीर्ण झालेल्या मुलांनादेखील नाराज होण्याचे कारण नाही. तुम्हाला आवडत असलेले अनेक सेलिब्रिटीदेखील दहावी, बारावीची परीक्षा उत्तीर्ण करु शकले नव्हते. 

2/9

हार मानू नका

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका. दहावी, बारावीची परीक्षा ही फक्त सुरुवात आहे. आयुष्यात अशा आणखी अनेक संधी येतील. जिथे तुमची क्षमता लोकांसमोर येईल. 10वी आणि 12वी मध्ये नापास झाले पण त्यांच्या टॅलेंटने त्यांना यश मिळवून दिले, अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया. 

3/9

सलमान खान

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानने फक्त 12वीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. पुढे शिक्षण घेण्याऐवजी त्याने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज त्याची गणना बॉलीवूडमधील अव्वल कलाकारांमध्ये केली जाते.

4/9

सचिन तेंडुलकर

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर कितवी शिकलाय माहितीय? आपल्या सर्वांचा लाडका सचिन केवळ 10वी पास आहे. पण क्रिकेटमध्ये त्याने मिळवलेले यश पाहून तो कितवी शिकलाय, यावर कोणी चर्चा केली नाही. ना कधी मार्कशीट पाहिली. 

5/9

कतरिना कैफ

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

अभिनेत्री कतरिना कैफलाही खूप जास्त शिक्षण करता आले नाही. मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी तिने वयाच्या 14 व्या वर्षी शाळा सोडली. आज तिचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते.

6/9

करिश्मा कपूर

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

कपूर घराण्यातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनेही लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्रीने शाळा सोडली.

7/9

काजोल

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलही लहानपणी खूप खोडकर होती. काजोलला अभ्यासात फारसा रस नव्हता असे म्हटले जाते. काजोलने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर ती कधीच शिक्षण पूर्ण करू शकली नाही.

8/9

कंगना राणौत

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना रणौतही 12वी पास आहे. रसायनशास्त्रात अनुत्तीर्ण झाल्यानंतर तिने अभिनय हे आपले करिअर म्हणून निवडले. अनेक वर्षांनी तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.  

9/9

अर्जुन कपूर

10th 12th Failed Indian  Celebrity SSC HSC Result Marathi News

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा अभिनेता अर्जुन कपूरही अभ्यासात खूपच कमजोर होता. तो 12वीच्या एका विषयात नापास झाला होता. यानंतर त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मीडिया इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला.