राज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम
Maharashtra Travel News : सध्याच्या घडीला अशीच एक अद्भूत गोष्ट राज्याला मिळालेला वारसा आणखी समृद्ध करताना दिसत आहे.
(Maharashtra Travel News) महाराष्ट्रात आजवर पुरातत्वं खात्यानं उत्खननाच्या माध्यमातून बऱ्याचदा अशा काही गोष्टी जगासमोर आणल्या आहेत ज्या पाहताना भारावल्यावाचून इतर कोणताही भाव चेहऱ्यावर येत नाही.
1/7
शिवमंदिर
2/7
सिंदखेडराजा
महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर म्हणून सिंदखेडराजा या ठिकाणाकडे पाहिलं जातं. इथं राजे लखुजीराव जाधव यांनी अनेक वर्षे आपली राजवट चालवली असं म्हटलं जातं. 1629 मध्ये लखुजीराव जाधव यांची दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यावर हत्या करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार शहराच्या पश्चिम भागात असलेल्या रामेश्वर मंदिराशेजारील परिसरातच त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
3/7
मंदिरवजा समाधी?
पुढे 1630 नंतर त्यांच्या समाधीस्थळाचं बांधकाम सुरु झालं आणि जवळपास 10 वर्षांनंतर ही मंदिरवजा समाधी उभारून पूर्ण झाली. आतापर्यंतच्या नोंदींनुसार ही देशातील हिंदुराजाची आतापर्यंतची सर्वात मोठी दगडी समाधी म्हणून ओळखली जाते. याच भागात मागील अनेक दिवसांपासून शहराच्या ऐतिहासिक वास्तू संवर्धन आणि जतन करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं.
4/7
शिवपिंड
दरम्यान संवर्धन कामातच केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत खोदकाम सुरू असताना इथं समाधी चौथऱ्यापासून पाच फूट खोल आणि समाधी मंदिरापासून जवळपास 20 फुटांच्या अंतरावर मोठी शिवपिंड आढळली. पुढे आणखी खोदकाम केलं असता या शिवपिंडीवर आणि आजुबाजूला सुबक नक्षीकामाचेही नमुने आढळले. लक्ष वेधून गेली ती म्हणते तिथं असणारी दगडी चौकट.
5/7
प्राथमिक अंदाज
सध्या हे अवशेष म्हणजे पुरातन शिव मंदिरच असल्याचा प्राथमिक अंदाज केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण टीमनं बांधला आहे. एकिकडे या मंदिरानं नदरा वळवलेल्या असतानाच दुसरीकडे मात्र समाधी परिसरात सापडल्यामुळं शिवपींड/ तत्सम अवशेष हे तत्कालीन राजघराण्यातील मोठ्या व्यक्तीची समाधी असण्याची शक्यता जाणकारांनी अधोरेखित केली आहे.
6/7