`आम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवायचे होते`; 80s च्या दशकातील `या` लोकप्रिय कपलचं होतं Open Marriage
Celebrity Couple Had Extramarital Affair : या लोकप्रिय सेलिब्रिटी कपलचं होते विवाहबाह्य संबंध... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा
Celebrity Couple Had Extramarital Affair : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता कबीर बेदी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी त्यांच्या विवाहबाह्य संबंध आणि ओपन मॅरेजविषयी काहीही न लपवता अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. कबीर बेदी यांनी 4 वेळा लग्न केलं होतं. त्यांनी पहिलं लग्न हे ओडिसी डान्सर प्रोतिमा बेदीशी केलं होतं. कबीर यांनी अनेक गोष्टी या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.
कबीर बेदी यांनी नुकतीच 'डिजिटल कमेंट्री'ला मुलाखत दिली होती. यावेळी कबीर बेदी यांनी त्यांच्या ओपन मॅरेज आणि विवाहबाह्य संबंधांविषयी सांगितलं आहे. यामुलाखतीत ते म्हणाले की मुलांसाठी त्यांना एकत्र राहायचं होतं आणि त्यासोबत त्यांना विवाहबाह्य संबंध देखील हवे होते. त्यामुळे त्यांनी ओपन मॅरेजमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. खरंतर, ओपन मॅरेज ठेवल्यानंतर ते त्यांच्या लग्नाला वाचवू शकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला.
ओपन मॅरेजची कॉन्सेप्ट
कबीर बेदी याविषयी सविस्तर सांगत म्हणाले, 'त्यावेळी, आम्हाला वाटलं की आम्हाला फक्त आणि फक्त मुलांसाठी एकत्र राहायचं आहे. मुळात असं होतं की तिला विवाहबाह्य संबंध हवे होते आणि मलाही तेच हवं होतं, तर आम्ही ठरवलं की ओपन मॅरेज ठेवूया. तिला जे हवं ते ती करु शकते आणि मला जे हवं ते मी करु शकते. यामुळे आम्ही आनंदीही राहू आणि मुलांचा सांभाळ देखील एकत्र मिळून करू शकतो. पण तरी सुद्धा आमची ओपन मॅरेजची कॉन्सेप्ट जशी अपेक्षा होती तशी राहिली नाही.'
हेही वाचा : 'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL
कबीर यांनी पुढे सांगितलं की 'आम्ही विभक्त झालो. आम्ही घटस्फोट घेतला. पण आमच्या सगळ्या जबाबदाऱ्या या पूर्ण केल्या होत्या. मी माझं घरं तिला दिलं आणि सगळ्या गोष्टींमध्ये तिची साथ दिली. आम्ही आयुष्यभर मित्र म्हणून राहिलो कारण आम्हाला दोन मुलं होती. आमची इच्छा होती की आमच्या मुलांना हे कळायला हवं की आमचे आई-वडील हे एकत्र नसले तरी ते आमचे आई-वडील आहेत. त्यावेळी मी अमेरिकेत राहत होतो कारण तिथे काम सुरु होतं. तर मुलं उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला भेटायला अमेरिकेत यायचे.'