न्यूड फोटोशूटमुळे Ranveer Singh मोठ्या अडचणीत, पोलिसात तक्रार
यामुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ranveer Singh Police Complaint: अभिनेता रणवीर सिंग यानं नुकतचं केललं न्यूड फोटोशूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोशूटवर चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या तर काहींनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. आता हे फोटोशूट करणं रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे. आज संध्याकाळीच एका स्वयंसेवी संस्थेनं त्याच्यावर चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. असे न्यूड फोटोशूट करून रणवीरने भारतीय संस्कृतीचं उल्लंघन केलं असून त्यानं महिलांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणवीर सिंगने दोन दिवसांपुर्वी पेपर मॅगझीनसाठी न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यानंतर रणवीरच्या या फोटोशूटवर अनेकांनी चीड व्यक्त केली. अनेकांना त्याने केलेलं हे फोटोशूट पसंत पडलं नव्हतं आणि आता त्याच्यावर कलम 67 A, 292, 293, 354 आणि 509 यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या स्वयंसेवी संघटनेनं हा गुन्हा दाखल केला आहे त्यांनी रणवीरवर त्यानं भारतीय संस्कृतीचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. भारत हा संस्कृती जतन करणारा देश आहे. या देशात अभिवक्ती स्वातंत्र्य आहे. बॉलीवूडमध्ये अभिनेत्याला नायक संबोधले जाते आणि सोशल मीडियावर अशा नायकांना फोलो करणारे असंख्य लोकं असतात तेव्हा अशाप्रकारे रणवीरने असे न्यूड फोटोशूट करू नये असं आरोप दाखल केलेल्या संस्थेनं म्हटलं आहे.
रणवीर सिंगचं हे फोटोशूट बर्न्ट रेनोल्डस या हॉलीवूड अभिनेत्याच्या फोटोशूटवरून प्रेरित होते. अभिनेता बर्न्ट रेनोल्ड्सने कॉस्मोपॉलिटियन मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं.
रणवीर सिंगने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सर्कस' या सिनेमाचे शूटिंग पुर्ण केले आहे. आणि लवकरच त्याचा आलिया भट्टसोबतचा करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा रिलिज होणार आहे.