Work From Theatre : मध्यंतरी असाच एक व्यक्ती थिएटरमध्ये बसून मस्तपैंकी काम करतो आहे अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे हा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा असंच काहीसं पाहायला मिळत आहे की काय अशी जोरात चर्चा रंगली आहे कारण सोशल मीडियावरून असाच एक फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगली आहे आणि नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. हा फोटो सोशल मीडियावर ट्विट करण्यात आला आहे. ज्यातून यावेळी एक माणूस चक्क हा जवान चित्रपट पाहता पाहता वर्क फ्रॉम होम करताना दिसतो आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हाही विचार करू लागाल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ट्विटरवरून एका युझरनं एक फोटो शेअर केला आहे ज्यात एक माणूस चक्क थिएटरमध्ये बसून काम करताना दिसतो आहे. त्यातून यावेळी हा चित्रपट दुसरा तिसरा कोणी नसून शाहरूख खानचा जवान हा आहे असा दावा यातून करण्यात आला आहे. परंतु अद्याप याची पुष्टी नाही. हा फोटो बंगलोरच्या इथला आहे असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहितीये का की मध्यंतरी असाच एक फोटो हा सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्यामुळे त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता असाच एक फोटो हा पुन्हा व्हायरल होतो आहे. ऑफिसमध्ये किंवा घरी काम करण्यापेक्षा नक्की या इसमानं थिएटरमधूनच का बरं काम करायला सुरूवात केली असेल याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 


हेही वाचा : 'सारखं विसरायला होतंय' स्मरणशक्ती कमी म्हणून आत्मविश्वास ढासळतोय? आधी 'या' सवयी सुधारा


@neelangana या ट्विटर युझरवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे ज्यात त्यांनी म्हटलं आहे की, ''जेव्हा जवानचा पहिल्या दिवशीचा पहिला शो हा महत्त्वाचा आहे परंतु त्याचसोबत आपल्याला कामही करायचे आहे. हे पीक बंगलोरयं आयुष्य आहे. एक माणूस हा चक्क एका थिएटरमध्ये बसून मस्तपैंकी काम करतो आहे. हा फोटो घेताना काहीच नुकसान झाले नाही.'' असं यावेळी लिहिलं आहे. 



नेटकऱ्यांनीही यावर कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एकानं लिहिलंय की, ''व्वा मलाही असंच काम करायचं. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, हो अशाप्रकारे फक्त बंगलोरमध्येच नाही तर संपुर्ण भारतात याचा बोलबाला आहे.''