मुंबई : इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल यांची चर्चा सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे. आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'तेरी मेरी' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांना एक गाणं गायलं ते  गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानू मंडल 'कॉमेडी स्टार्स' नावाच्या एका शोमध्ये उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनी 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे गाणं गायलं. त्यामुळे त्यांचे चाहते पुन्हा त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत. 


सध्या त्या त्यांच्या आगामी बायोपिकच्या कामात व्यस्त आहे. रानूंच्या बायोपिकमधील काही भाग त्यांच्या गावी शूट करण्यात येणार आणि काही भाग मुंबईत शूट करण्यात येणार आहे. रानूंच्या बायोपिक मध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारणार आहे.


चित्रपटाची निर्मिती शुभोजित मंडल करणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रानू मंडल यांच्या आयुष्याचा प्रवास रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.