Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani's Daughter School : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका सगळ्यांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेनंच नाही तर कलाकारांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी ही नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मालिकेत आईची भूमिका साकारणारी मधुराणी ही खऱ्या आयुष्यात देखील आई आहे. मधुराणी तिच्या लेकीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता मधुराणी चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिनं तिच्या लेकीच्या शिक्षणासाठी घेतलेला निर्णय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुराणीनं ‘हंच मीडिया’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लेकीच्या शाळेविषयी खुलासा केला आहे. त्यावेळी तिनं सांगितलं की तिच्या लेकीच्या शाळेत ना कोणता गणवेश आहे, ना कोणतं बोर्ड आणि ना कोणता वर्ग... त्यामुळे अशा कोणत्या शाळेत मधुराणीची लेक जाते असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याविषयी मधुराणीनं या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मधुराणीनं सांगितलं की तिनं तिच्या लेकीसाठी शाळा निवडताना आणि शोधण्यासाठी खूप अभ्यास केला. मग लेकीच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या शाळेची तिनं निवड केली. मधुराणी ही शूटिंगच्या निमित्तानं मुंबईत असते तर तिची लेक ही पुण्यात असते. तिच्या लेकीला पुणे खूप आवडतं. 'तिची शाळा ही वेगळी आहे. मुंबईत त्या प्रकारची शाळा असती तर मी तिला लगेच इथे घेऊन आले असते. तिच्या शाळेचं नाव गोकुळ असं आहे. तिला ना कुठलं बोर्ड, ना वर्ग, ना बसायला बाक, ना इयत्ता, ना अभ्यासक्रम, ना गणवेश. तिच्या स्वभावा प्रमाणे तिची शाळा आहे. डॉ. ज्योत्स्ना पेठकर या शाळेच्या संचालिका आहेत', असं मधुराणीनं सांगितलं.  


हेही वाचा : मधुबाला यांच्या बंगल्यावर रात्रभर अभिनेत्रीच्या भुताची वाट पाहायचे इम्तियाज अली; म्हणाले 'मला आजही तो अनुभव...'


पुढे मधुराणी म्हणाली की 'एक कळप आहे आणि त्या कळपाचा तुम्ही भाग असायलाच हवं असं काही नाही, असं मला वाटतं. आपल्या मुलांना ओळखून त्या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. त्यांना सांगायला हवं की इतर 10 लोक ते करतायत म्हणून तुम्हीपण ते करायलाच हवं असं नाही.' मधुराणी विषयी बोलायचं झालं तर ती अभिनेत्रीसोबत एक कवयित्री देखील आहे.