Aamdani Atthanni Kharcha Rupaiya : तुम्हाला सगळ्यांना 2001 मध्ये प्रदर्शित झालेला गोविंदा आणि जूही चावलाचा 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' आठवतोय. या चित्रपटात त्या दोघांसोबत अनेक कलाकारांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात जॉनी लिव्हर, चंद्रचूड सिंह, तब्बू, ईशा कोप्पिकर आणि  विनय आनंद होते. विजय आनंदला या चित्रपटातून चांगली ओळख मिळाली होती, विनय आनंद हा गोविंदाचा भाचा आहे आणि त्यानं हिंदीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. मात्र, विनय आनंदनं 2015 नंतर कोणत्याही मोठ्या हिंदी चित्रपटामध्ये काम केलेलं नाही. मात्र, आता तो भोजपुरी चित्रपटांचा चेहरा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा बॉलिवूडमध्ये त्याला हवं तेवढं फेम मिळालं नाही तेव्हा विनयनं भोजपुरी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि तिथे त्यानं धमाकेदार एन्ट्री केली. तिथे त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आणि आज त्याचे चित्रपट हे सुपरहिट ठरतात. विनयचा माई के कर्ज, भइल तोहरा से प्यार, कजरा मोहब्बत वाला, होके तू रहबू हमार, बिहारी रिक्शावाला, बृजवा सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले हिट ठरले. भोजपुरी चित्रपटांशिवाय विनय आनंदनं त्याचा म्यूजिक एल्बम देखील काढला होता आणि अनेक लोकप्रिय अशी गाणी त्यातून निघाली. त्याची पत्नी ज्योती आनंदनं विनयसाठी अनेक गाणी लिहिली होती आणि त्याचे एल्बम रिलीज करण्यात आले होते. 



2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमदनी अठन्नी खर्चा रुपैयात दिसलेल्या विनयच्या तुलनेत आताचा विनय हा प्रचंड बदलला आहे. त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला असं म्हणता येईल. त्यासोबत त्याचा फिटनेसदेखील पूर्णपणे बदलला आहे. त्यासोबत त्याच्या फिटनेसची एक वेगळीच क्रेझ आहे. विनय आनंद त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेगवेगळे अपडेट्स देत असतो. तो भोजपुरी चित्रपटांतील सुपरस्टार असल्याचे म्हटले जाते. इतकंच नाही तर भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार असलेल्या निरहुआसोबत अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्यानं स्क्रिन शेअर केली आहे.  


हेही वाचा : 'हे म्हणणं योग्य नाही की ते आमच्यापेक्षा...', बॉलिवूड वर्सेस साऊथवर अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य; बिग बींनी सांगितलं चित्रपटसृष्टीचं सत्य


विनय आनंदनं बॉलिवूड चित्रपटसृष्टीत 'लो मैं आ गया' या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई करू शकला नव्हता. विजय आनंद हा गोविंदाची बहीण पुष्पा आहूजा यांचा मुलगा आहे.