NEP vs SA : एका धावेने पराभव झाल्याने नेपाळच्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा Photos

Nepal Cricket Team : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 31 वा सामना नेपाळ आणि साऊथ अफ्रिका (South Africa vs Nepal) या दोन्ही संघात खेळवला गेला. या सामन्यात नेपाळचा केवळ एका धावेने पराभव झालाय.

| Jun 15, 2024, 16:18 PM IST
1/7

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

नेपाळचा संघ यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये उलटफेर करेल, अशी शक्यता होती. अशातच आता नेपाळचा संघ इतिहास रचण्यापासून थोडक्यात राहिला.

2/7

रोहित पॉडेल

रोहित पॉडेलच्या नेतृत्वाखाली नेपाळ संघाने अफलातून कामगिरी केली अन् साऊथ अफ्रिकेला घाम फोडला. मात्र, हातातील विजय गमावल्याने नेपाळच्या खेळाडू्ंना अश्रू अनावर झाले.  

3/7

अश्रू अनावर

धावबाद झाल्यानंतर गुलशन झा नाराज झाला अन् मैदानात त्याला अश्रू अनावर झाले. तर सोमपाल कामी याच्या डोळ्यात देखील पाणी आल्याचं दिसून आलं.

4/7

चाहते नाराज

स्टेडियमवर बसलेल्या काही नेपाळी चाहत्यांना पराभवाचा इतका धक्का बसला की त्यांना अश्रू आवरले नाहीत. 

5/7

पहिल्यांदाच सहभाग

नेपाळच्या दृष्टीने सामना खूप महत्त्वाचा होता. नेपाळने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. अशातच त्यांना अजून एकही विजय मिळवता आला नाहीये.

6/7

खात्यात 1 गुण

नेपाळला नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. तर श्रीलंकेविरुद्ध सामना रद्द झाला होता. त्यामुळे नेपाळच्या खात्यात 1 गुण आहे.

7/7

अखेरचा सामना

अशातच आता नेपाळचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध 17 जून रोजी होणार आहे.