आमिर खानची निर्मीती असलेला 'लगान' सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. 'लगान' हा सिनेमा ऑस्करला नामांकित झालेला तिसरी हिंदी सिनेमा आहे. या सिनेमाबाबत आमिर खानने नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरली होती, याचा खुलासा अभिनेता यशपाल शर्माने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्कर नॉमिनेटेड सिनेमा 'लगान' मध्ये सहकलाकाराची भूमिका करणारा अभिनेता यशपाल शर्माने सिनेमा आणि आमिर खानच्या स्ट्रॅटेजीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं की, कलाकारांना महिला किंवा दारू यासारख्या आकर्षित करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी आमिर खानने एक गोष्ट आवर्जून 5 महिने केली. यासाठी आमिर खान कलाकारांना घेऊन दररोज रात्री पत्ते खेळत असे. यशपाल शर्माने केलेला हा खुलासा आमिर खानच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट' या उपादीला अतिशय खरा ठरवत आहे. 


आमिर खान दरवर्षी लगानच्या संपूर्ण टीमला दिवाळी पार्टीला आवर्जून बोलवत असल्याचंही यशपालने सांगितलं. फ्रायडे टॉकीज यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान यशपाल शर्मा म्हणाले, "मला वाटते की आमिर खान थोडा उद्धट असू शकतो. कारण इतर कलाकारांसोबतच्या माझ्या अनुभवाने मला तेच शिकवले आहे. माझ्यासोबतचे काही एनएसडी पदवीधर कलाकार स्वतःला स्टार समजतात. 
पण आमिर खान सोबतचा अनुभव वेगळा होता. पण आमिर खान हा चांगला माणूस आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे.  भुजच्या वाळवंटात चित्रपटाच्या शूटिंगची आठवण सांगताना यशपाल शर्मा म्हणाला की, " तो (आमिर खान) चिखलात बसून पेपर कपमध्ये चहा प्यायचा."


5 महिने एकत्र पण...


आमिर दररोज रात्री सगळ्या कलाकारांना घेऊन पत्ते खेळत असे. आम्ही रोज संध्याकाळी एकत्र जमायचो आणि पत्ते खेळायचो. कदाचित प्रत्येकाला महिला आणि दारू यासारख्या आकर्षिक करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवण्याची आमीरची रणनीती असावी. त्या सेटवर सगळे एकत्र होते आणि आम्ही पाच महिन्यांहून अधिक काळ तो सेट केला. यामुळेच या सिनेमात आम्ही ती गोष्ट चांगल्यापद्धतीने मांडू शकलो. 


यशपाल म्हणाले की, क्रूने असे बंध तयार केले होते, आमिर आजही प्रत्येक दिवाळीला कार्ड पार्ट्यांचे आयोजन करतो. “आम्ही एकत्र पाणीपुरी खात गप्पा मापायचो. एवढंच नव्हे तर एकत्र चित्रपट बघायला गेलो, एकत्र क्रिकेट खेळायचो, एकत्र तालीम करायचो. या सगळ्याचा चांगला परिणाम सिनेमात पाहायला मिळाला. यशपाल म्हणाले की, यामुळेच आम्ही अतिशय फोकस आणि चांगल्या पद्धतीने काम करु शकलो.