आमिर खान 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. या शोमध्ये तो त्याच्या आयुष्यातील अनेक गुपिते उलघडली आहेत. आमिरला लोक 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखतात. अनेकवेळा हा प्रश्नही लोकांच्या मनात येतो की, त्याला हे नाव कोणी दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयच्या वृत्तानुसार, आमिर खानने सांगितले की, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची उपाधी दिली आहे. आमिर खानने सांगितले की, ही घटना त्या दिवसात घडली जेव्हा आमिर इंद्र कुमारच्या 'दिल' चित्रपटाचे शूटिंग करत होता, त्या चित्रपटाचे कॅमेरामन बाबा आझमी होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


एके दिवशी ते दोघे बाबा आझमींच्या घरी चित्रपटावर चर्चा करत होते, तेव्हा शबाना आझमी यांनी आमिर खानला चहा देऊ केला. आमिरला चहा देताना त्याने चहामध्ये किती साखर देऊ असे विचारले.


काय होती 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ची कथा?


आमिर खानने त्यावेळी बाबा आझमी सांगत असलेल्या कथेत अडकला होता. त्यामुळे त्याला सुरुवातीला शबाना आझमी काय सांगत आहेत, हे कळलंच नाही. मग त्याने शबाना आझमी यांना 'कप किती मोठा आहे?'आणि नंतर 'चमचा किती मोठा आहे?' हे विचारलं. 


यानंतर शबाना आझमी यांनी आमिर खानचा हा किस्सा सगळीकडे सांगितला. जर तुम्ही आमिर खानला त्याच्या चहातील साखरेबद्दल विचारले तर तो सर्वात आधी तुम्हाला कपचा आकार विचारेल आणि नंतर चमचा कोणत्या आकाराचा आहे हे विचारेल. यावरुनच आमिरला 'मिस्टर परफेक्शनिस्ट'हा टॅग मिळाला.


आमिर खानचे सध्याचे प्रोजेक्ट्स 


दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आमिर खान निर्माता म्हणून 'लाहोर 1947' ची निर्मिती करत आहे, ज्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी आहेत. या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल आणि अली फजल मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर अभिनेता म्हणून आमिर खान 'तारे जमीन पर'चा सिक्वेल असलेल्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूजाही दिसणार आहे. आमिर खान यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सज्ज झाला आहे.