Aamir Khan : नुकतंच बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या लेकीचं लग्न झालं. त्याच्या आनंदात असताना दुसरीकडे त्याच्या जवळच्या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. आमिरच्या मित्राचे निधन झाले असून हा तोच मित्र आहे ज्यानं एक प्रोड्युसर म्हणून 'लगान' मध्ये काम केले होते. त्याच निमित्तानं आमिर हा गुजरातच्या कच्छ परिसरात गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, आमिर त्याचा जुना मित्र महावीर चाडच्या निधनानंतर लगेच गुजरातच्या दिशेनं निघाला. आज 21 जानेवारी रोजी चार्टर्ड प्लेननं तो भुजला पोहोचला. आमिरनं रस्ता अपघातात निधन पावलेल्या कोटाई गावात राहणाऱ्या त्याचा मित्र महावीर चाडच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तो फक्त त्यांना भेटला नाही तर त्यांच्यासोबत बसून त्यानं त्यांना सावरण्याचा सल्ला दिला. महावीर चाडच्या निधनाच्या बातमीनं आमिरला मोठा धक्का बसला होता. असं म्हटलं जातं की आमिर त्या ठिकाणी देखील जाणार आहे जिथे लगानचं शूटिंग झालं. तिथल्याच शेतांमध्ये आमिर आणि त्याच्या टीमनं प्रॅक्टिस केली होती. तर फायनल मॅचसासाठी तब्बल 10 हजार लोकांना बोलावण्यात आलं आणि त्यांना प्रत्येकी 50 रुपये देण्यात आले होते. 



आमिर खाननं गेल्या काही दिवसांपासून आयरा खानच्या लग्नात व्यग्र होता. मुंबईत आयरा आणि नुपूरचं रजिस्टर मॅरेज झालं आणि त्यानंतर त्यांनी उदयपुरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर मुंबईत त्यांच्या लग्नासाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले. त्यात जवळपास 2500 पाहुणे आल्याचे म्हटले जाते. सध्या आयरा ही पती नुपूर शिखरेसोबत हनीमुनवर गेली आहे. 


हेही वाचा : ताजमहलसमोर बहिणीसोबत असलेल्या 'या' दोन भावंडांनी बॉलिवूडवर केलं राज्य! एक होता रोमान्सचा किंग


आमिरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो अखेरीस 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसला होता. सध्या तो एक चित्रपट बनवत असून त्याचं नाव 'चॅम्पियन' असल्याचं म्हटलं जातं. सगळ्यात आधी म्हटलं जातं होतं की यात फरहान अख्तर दिसणार आहे. त्यानंतर बातमी आली की आमिर स्वत: यात अभिनय करणार आहे. याशिवाय असं देखील म्हटलं जातं की तो गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या बायोपिकमध्ये देखील दिसणार आहे. मात्र, अजुन त्याच्या आगामी चित्रपटांविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.