Aashram 3 : अनेक इंटिमेट सीन असलेली सीरिज पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया
ड्रग्स, बलात्कार, राजकारण....., इंटिमेट सीनने भरलेली सीरिज पाहताचं प्रेक्षकांची प्रतिक्रिया
मुंबई : सध्या 'आश्रम 3' सीरिजची सर्वत्र चर्चा आहे. आज सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. 'बाबाजी की जय हो...' अशी सुरूवात होणाऱ्या सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका साकारून प्रेक्षकांना थक्क केलं, तर दुसरीकडे अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. आश्रम सीरिजच्या दोन सीरिजनंतर तिसऱ्या भागाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सीरिज पाहिल्यानंतर ट्विटरवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
अनेक ट्विट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कळेल की अनेकांना सीरिज आवडली आहे, तर अनेकांना सीरिज आवडलेली नाही. या वेब सीरिजबद्दल ट्विटरवर एका यूजरने कमेंट केली - 'आश्रम 3' बघायला मजा आली. बॉबी देओलचा अप्रतिम अभिनय. तुमची ही लपलेली प्रतिभा उत्कृष्ट आहे. प्रकाश झा यांना पुन्हा एकदा सलाम.
तर दुसऱ्या युजर म्हणतो की, 'मी 'आश्रम 3' बघायला खूप उत्सुक होतो. पण सीरिजची कथा फार संथ गतीने पुढे जात आहे. त्यामुळे मी आता 'आश्रम 4' बद्दल उत्सुक नाही.'
प्रेक्षकांचे कमेंट पाहाता सीरिजला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.
'आश्रम' वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे.
बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.