अभिनय बेर्डे पुन्हा रूपेरी पडद्यावर झळकणार, हे असेल सिनेमाचं टायटल
मराठी सिनेमाचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि पहिल्याच ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.
मुंबई : मराठी सिनेमाचे सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आणि पहिल्याच ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.
या सिनेमातील त्याची भूमिका चांगलीच पसंत केली गेली. त्यामुळे तो आता कोणत्या सिनेमात दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अशातच त्याच्या पुढील सिनेमाचा खुलासा झाला आहे.
अभिनय बेर्डे पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर तरूणींच्या मनात घर करण्यासाठी येतो आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमासाठी अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनय एकत्र आले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी एकत्र अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. आता सचिन पिळगावकर हे अभिनयसाठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याचे समजेत.
सचिन पिळगावकर हे एका सिनेमाची निर्मिती करत असून ‘अशी ही आशिकी’ असं या सिनेमाचं टायटल असल्याची चर्चा रंगली आहे. या सिनेमात एक लव्हटोरी बघायला मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. तर या सिनेमाचा हिरो अभिनय बेर्डे असणार आहे. सध्या या सिनेमासाठी अभिनयच्या हिरोईनचा शोध घेणं सुरू आहे.
अनेक सिनेमांमध्ये सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सुपरहिट ठरली. आता सचिन पिळगावकर आणि अभिनय बेर्डे यांची जोडी रूपेरी पडद्यावर काय कमाल दाखवते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या प्रोजेक्टबाबत कुणीही अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही.